देश विदेश

कोरोना झाला तर ममता बॅनर्जींची गळाभेट घेणार’; असं म्हणणाऱ्या बीजेपी नेत्याचा रिपोर्ट आला पॉझिटिव्ह

कलकत्ता — मला जर कोरोनाची बाधा झाली तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची गळाभेट घेणार असल्याचे वक्तव्य करणारे भाजपाचे अनुपम हाजरा यांना कोरोना ची लागण झाली आहे. नुकतीच त्यांची भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पदी नियुक्ती झाली आहे.

पीटीआय ने दिलेल्या वृत्तानुसार अनुपम हाजरा कोरोना संक्रमित झाले आहेत. गेल्या आठवड्यात पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना अनुपम हाजरा यांनी टीएमसीवर निशाणा साधला होता. ते यावेळी म्हणाले होते की, आमचे कार्यकर्ते कोरोनापेक्षाही मोठा शत्रूशी सामना करीत आहेत. त्यामुळे मला जर कोरोन झाला तर मी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची गळाभेट घेईल असे वक्तव्य केले होते यावरून देशभरात मोठा गदारोळ माजला होता.इतकचं नाही तर सिलिगुडीमध्ये त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली होती.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close