आरोग्य व शिक्षण

आरटीई प्रवेश प्रक्रिया; ८ ऑक्टोबरपर्यंत करता येणार प्रवेश निश्चित,पालकांना दिलासा

वेटींगलिस्ट मधील विद्यार्थ्याना मोफत प्रवेशासाठी संधी – मनोज जाधव

बीड — शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) आर्थिकदृष्टय़ा दुर्बल व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांसाठीची २५ टक्के जांगा वरील मोफत प्रवेश प्रक्रियाची पहिल्या सोडतीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्यानंतर अखेर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांनाही प्रवेशासाठी संधी मिळाली आहे. १ ऑक्टोबरपासून प्रतीक्षा यादीत नाव असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना ८ ऑक्टोबरपर्यत शाळेत जाऊन प्रवेश घेता येईल. अशी माहिती शिवसंग्रामचे युवा नेते तथा आरटीई कार्यकर्ते मनोज जाधव यांनी दिली आहे.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षण अधिकार अधिनियम २००९ नुसार प्राथमिक शिक्षण संचालनालया द्वारे खाजगी शाळांमध्ये २५टक्के जागांवर आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येते.१७ मार्च रोजी आरटीई प्रवेश प्रक्रिया ची ऑनलाईन सोडत काढण्यात आली. यात बीड जिल्ह्यात आरटीई प्रवेशासाठी २ हजार ९२६ जागा मोफत प्रवेशासाठी राखीव आहेत. या जागेसाठी जिल्हाभरातून ६ हजार ८९५ अर्ज ऑनलईन दाखल करण्यात आले होते. या अर्जा पैकी मूळ निवड यादीतील २ हजार ८४५ विद्यार्थ्यांची निवड मोफत प्रवेशासाठी झाली होती. त्या पैकी १ हजार ८७४ विद्यार्थ्याचे प्रवेश निश्चित झाले असून.उर्वरित १ हजार ५२ जागांसाठी प्रतीक्षा यादी (वेटींग लिस्ट) मधील विद्यार्थ्यांना संधी देण्यात आली आहे. या मुळे वेटींग लिस्ट मधील अधांतरी असलेल्या पालकांना आता दिलासा मिळणार आहे.हे पालक गेली अनेक दिवसा पासून शाळेत प्रवेश घेणे किंवा फी भरणे या सह अनेक स्मसायेने चिंतित होते. या निवडी मुळे वेटींग लिस्ट विद्यार्थ्यांच्या पालकांना दिलासा मिळणार असल्याचे मनोज जाधव म्हंटले आहे.

प्रतिक्षा यादी मधील निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना सूचना.

⚫सन २०२०-२१ या वर्षाकरिता प्रतिक्षा यादीतील बालकांच्या प्रवेशाची प्रक्रिया दिनांक ३०/९ /२०२० ते ८/१०/२०२० पर्यंत सुरु राहील.

⚫शाळांमध्ये शिल्लक राहिलेल्या रिक्त जागानुसार पालकांना SMS द्वारे प्रवेशाचा दिनांक कळविला जाईल परंतू पालकांनी फक्त मेसेज ( SMS ) वर अवलंबून राहू नये.

⚫पालकांनी आपल्या पाल्याची निवड झाली अथवा नाही हे पाहण्यासाठी आर.टी.ई. पोर्टलवर प्रवेशाची तारीख या ठिकाणी आपला अर्ज क्रमांक टाकून प्रवेश घेण्याचा दिनांक पाहावा.

⚫शाळेत प्रवेश घेण्यासाठी पालकांनी गर्दी करू नये. तसेच प्रवेश घेण्यासाठी सोबत बालकांना घेऊन जाऊ नये.

⚫पालकांनी शाळेत प्रवेशाकरिता घेऊन जाण्याची कागद पत्रे : १ ) प्रवेशाकरिता लागणारी मूळ कागद पत्रे आणि त्यांच्या छायांकित प्रती २ ) आर.टी.ई.पोर्टलवरील हमी पत्र आणि अर्जाची स्थिती या tab वर click करून हमी पत्र आणि अलॉटमेंट लेटर ( Allotment letter ) यांची प्रिंट काढून शाळेत घेऊन जाणे .

तालुका निहाय आत्ता पर्यंत प्रवेश मिळालेले विद्यार्थ्यांची माहिती

१) आंबेजोगाई
शाळा – ३७
प्रवेशासाठी निवड झालेले विद्यार्थी – ५००
प्रवेश निश्चित झालेले विद्यार्थी – ३२७
रद्द केलेले प्रवेश -२
 प्रवेश घेण्यासाठी शाळेत न गेलेले विद्यार्थी – १७२

२)आष्टी –
शाळा – १०
प्रवेशासाठी निवड झालेले विद्यार्थी – ५६
प्रवेश निश्चित झालेले विद्यार्थी – ३३
रद्द केलेले प्रवेश -३
 प्रवेश घेण्यासाठी शाळेत न गेलेले विद्यार्थी – २०

३)बीड –
शाळा – १७
प्रवेशासाठी निवड झालेले विद्यार्थी – २२४
प्रवेश निश्चित झालेले विद्यार्थी – १६७
रद्द केलेले प्रवेश – ०
 प्रवेश घेण्यासाठी शाळेत न गेलेले विद्यार्थी – ५७

४)धारूर
शाळा – ८
प्रवेशासाठी निवड झालेले विद्यार्थी – १३०
प्रवेश निश्चित झालेले विद्यार्थी – ८८
रद्द केलेले प्रवेश -०
 प्रवेश घेण्यासाठी शाळेत न गेलेले विद्यार्थी – ४४

५)गेवराई –

शाळा – ३६
प्रवेशासाठी निवड झालेले विद्यार्थी – ४०६
प्रवेश निश्चित झालेले विद्यार्थी – २७२
रद्द केलेले प्रवेश -०
 प्रवेश घेण्यासाठी शाळेत न गेलेले विद्यार्थी – १३४

६)केज –
शाळा – १९
प्रवेशासाठी निवड झालेले विद्यार्थी – २६०
प्रवेश निश्चित झालेले विद्यार्थी – १७४
रद्द केलेले प्रवेश -०
 प्रवेश घेण्यासाठी शाळेत न गेलेले विद्यार्थी – ८६

७)माजलगाव –
शाळा – ३१
प्रवेशासाठी निवड झालेले विद्यार्थी – ३६२
प्रवेश निश्चित झालेले विद्यार्थी – १७७
रद्द केलेले प्रवेश -०
 प्रवेश घेण्यासाठी शाळेत न गेलेले विद्यार्थी – १८५

८)परळी –
शाळा – ३०
प्रवेशासाठी निवड झालेले विद्यार्थी – ४१२
प्रवेश निश्चित झालेले विद्यार्थी – ३१५
रद्द केलेले प्रवेश-१
 प्रवेश घेण्यासाठी शाळेत न गेलेले विद्यार्थी – ९६

९)पाटोदा –
शाळा – ४
प्रवेशासाठी निवड झालेले विद्यार्थी – ३३
प्रवेश निश्चित झालेले विद्यार्थी – १८
रद्द केलेले प्रवेश -०
 प्रवेश घेण्यासाठी शाळेत न गेलेले विद्यार्थी – १५

१०)शिरूर –
शाळा – ९
प्रवेशासाठी निवड झालेले विद्यार्थी – ८०
प्रवेश निश्चित झालेले विद्यार्थी – ६३
रद्द केलेले प्रवेश -१७
 प्रवेश घेण्यासाठी शाळेत न गेलेले विद्यार्थी – ०

११) वडवणी –
शाळा – ७
प्रवेशासाठी निवड झालेले विद्यार्थी – ८०
प्रवेश निश्चित झालेले विद्यार्थी – ६३
रद्द केलेले प्रवेश -०
 प्रवेश घेण्यासाठी शाळेत न गेलेले विद्यार्थी – १७

१२) बीड शहर
शाळा – १८
प्रवेशासाठी निवड झालेले विद्यार्थी – ३०२
प्रवेश निश्चित झालेले विद्यार्थी – १७९
रद्द केलेले प्रवेश -०
 प्रवेश घेण्यासाठी शाळेत न गेलेले विद्यार्थी – १२३

एकूण जिल्ह्यातील आकडेवारी

शाळा – २२६
प्रवेशासाठी निवड झालेले विद्यार्थी – २८४५
प्रवेश निश्चित झालेले विद्यार्थी – १८७४
रद्द केलेले प्रवेश -२३
 प्रवेश घेण्यासाठी शाळेत न गेलेले विद्यार्थी – ९४८

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close