आपला जिल्हा

बिनधास्त हिंडा गावभर, कोरोना चा आकडा गेलाय दोनशेवर

बीड — सरकारी नियमांच पालन न करता बिनधास्तपणे लोकांचा वावर सुरु झाल्यामुळे रुग्ण संख्येचा आकडा आज दोनशे वर जाऊन पोहोचला आहे. कोरोना ने एखादा रुग्ण दगावला तर सरकारच्या लेखी तो फक्त आकडा आहे. मात्र तुमचा जीव तुमच्या परिवारासाठी अनमोल आहे.हे न विसरता अंऽऽ काय होतंय असं म्हणून आपला जीव धोक्यात घालू नका नियमांचं पालन आता तरी करा असं म्हणण्याची वेळ वारंवार येत आहे.


फक्त 804 जनांच्या तपासणीमध्ये 200 रुग्ण सापडले आहेत. अंबाजोगाई मध्ये चोवीस रुग्ण सापडले असून आष्टी मध्ये हा आकडा 28 वर गेला आहे सोलेवाडी झगडे वस्ती बसस्थानकासमोर कडा, बर्फ कारखान्यांमधील दोन कामगार धामणगाव शेरी फाटा शिराळ या ठिकाणी रुग्ण संख्या जास्त सापडली. बीडमध्ये अर्धशतकाचा आकडा ओलांडून 62 वर संख्या गेली आहे. चौसाळा येथे पाच रुग्ण सापडले असून सात्रा 3, रुइगव्हाण पालसिंगण पिंपळगाव घाट, या ठिकाणी देखील रुग्णांचा आकडा मोठा दिसला धारूर मध्ये तेरा वर आकडा गेला आहे पहाडी पारगाव कासारी बोडका कसबा विभाग पाटील गल्ली या ठिकाणी रुग्ण आढळले गेवराई मध्ये 15 रुग्ण हे गेवराई पोलीस ठाण्याचा एक कर्मचारी जातेगाव पाचेगाव सिरसदेवी किनगाव या गावांचा रुग्ण सापडलेल्या मध्ये समावेश आहे. केज मध्ये 12 रुग्ण सापडले असून स्टेट बँक ऑफ इंडियाचे चार कर्मचारी पॉझिटिव आले आहे. माजलगाव मध्ये 12 रुग्ण सापडले सुलतानपूर लवूळ नित्रुड चिंचगव्हाण शृंगारवाडी बेलुरा या ठिकाणीदेखील रुग्ण आढळले. परळी चा आकडा मात्र काहीसा दिलासा दायक असून फक्त आठ रुग्ण सापडले आहेत. पाटोद्यात 11, शिरूर मध्ये 8, वडवणी मध्ये सात रुग्ण सापडले आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close