आपला जिल्हा

बीड जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या 182 वर

बीड — जिल्ह्यात गुरुवारी कोरोना रुग्णसंख्या दोनशेच्या जवळ पोहोचली आहे. बाराशे 50 जणांच्या अहवालात 182 रुग्ण पॉझिटिव तर 1068 जण निगेटिव्ह आले आहेत.

अंबाजोगाई तालुक्यात सतरा रुग्ण सापडले असून यशवंतराव चव्हाण चौक उजनी श्रीनगर मांडवा रोड या ठिकाणी मोठ्या संख्येने रुग्ण सापडले. आष्टी मध्ये रुग्णांचा आकडा तेवीस वर गेला आहे कडा कारखाना सुंदर नगर कडा कारखेल हरिनारायण आष्टा शिराळ कोयाळ याठिकाणी रुग्ण मोठ्या संख्येने आढळून आले
बीड तालुक्यात रुग्णांचा आकडा 38 वर गेला आहे यापैकी तब्बल 8 रुग्ण चौसाळा येथे सात्रा, रौळगाव सावरगाव येथेदेखील रुग्ण सापडले. शाहू नगर भक्ती कन्स्ट्रक्शन या ठिकाणीदेखील रुग्ण संख्या जास्त आढळली.धारूर तालुक्यात 21 रुग्ण सापडले तेलगाव पहाडी पारगाव मध्ये लक्षणीय रुग्णसंख्या वाढलेली आढळून आली. गेवराई मध्ये बारा रुग्ण सापडले. केज मध्ये 23 रुग्ण सापडले कोरडेवाडी सारणी सांगवी वाघे बाभळगाव, शिक्षक कॉलनी तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया येथे दोन कर्मचारी पॉझिटिव आढळून आले. माजलगाव मध्ये 22 रुग्ण सापडले यामध्ये शिवाजीनगर येथे सुलतानपूर या परिसरात रुग्ण संख्या लक्षणीय वाढली. परळी मध्ये नऊ रुग्ण सापडले. टोकवाडी जलालपूर प्रिया नगर माणिक नगर या नेहमीच्या ठिकाणावर पुन्हा रुग्ण सापडले. पाटोदा मध्ये पाच रुग्ण आढळून आले शिरूर मध्ये तीन तर वडवणी मध्ये चिखल बीड उपळी येथे जास्त रुग्ण संख्या सापडल्यामुळे हा आकडा 9 वर पोहोचला आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close