क्राईमदेश विदेश

यूपीतल्या बलरामपुर मध्ये सामूहिक बलात्कार, पीडितेचे पाय तोडले: म.प्र. मधेही अल्पवयीन मुलीवर बलात्कार

बलरामपूर — उत्तर प्रदेशच्या हाथरस येथील दलित मुलीवरील सामूहिक बलात्काराच्या घटनेच्या धक्क्यांतर नागरिक सावरलेलेही नसताना युपीतील बलरामपूरमध्ये आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आणखी एका २२ वर्षीय दलित मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केल्याचं समोर आलं आहे. आरोपींनी पीडितेचे कंबर आणि पाय मोडले याबरोबरच मध्यप्रदेशातील खरगोन येथे झोपडीत राहणार्‍या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे.
दोन मित्रांनी मैत्रीच्या बहाण्याने दलित मुलीला बोलावून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. हे घृणास्पद कृत्य केल्यानंतर दोन्ही आरोपींनी तिची कंबर आणि पाय मोडले गंभीर अवस्थेत असलेल्या या मुलीला रिक्षातून घरी पाठवले. नंतर तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. तिला आधी इंजेक्शन दिलं गेलं आणि मग तिच्यावर आत्याचार केला गेला, असा पीडित मुलीच्या कुटुंबीयांचा आरोप आहे. प्रचंड वेदना होत आहेत. आता मी वाचू शकणार नाही, असं गंभीर अवस्थेत आलेल्या मुलीने मृत्युपूर्वी म्हणाल्याचं कुटुंबीयांनी सांगितलं.
मध्यप्रदेशातील खरगोन येथे बुधवारी रात्री एका अल्पवयीन मुलीवर तीन जणांनी बलात्कार केला असल्याची पोलिसांनी माहिती दिली. पोलिस अधीक्षक शैलेंद्रसिंह चौहान म्हणाले, ” ही अल्पवयीन आणि तिचा भाऊ झोपडीत राहत होता. त्यानंतर बुधवारी रात्री तीन जणांनी त्याच्याजवळ येऊन तिच्या भावावर हल्ला केला. गावकर्‍यांची मदत घेण्यासाठी भाऊ धावला. ‘त्यानंतर तिन्ही आरोपींनी मुलीला उचलून शेतात नेले आणि त्या सर्वांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर आरोपींनी मुलीला रस्त्याच्या कडेला फेकले आणि तेथून पळून गेले. सध्या आरोपी फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close