आपला जिल्हा

बीड-लातूर सह मध्य महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता

पुणे — मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत हवामान ढगाळ आहे . त्यामुळे आज 1 ऑक्टोबर रोजी नाशिक , नगर , पुणे तसेच मराठवाड्यातील बीड , लातूर जिल्ह्यात आणि विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे .
गेल्या आठवडाभरापासून राज्यातील अनेक भागांत पावसाने उघडीप दिली आहे . तसेच कमाल तापमानातही वाढ झाली आहे . मात्र , बुधवारी दि.३० सप्टेंबर दुपारपासून अचानक ढगाळ वातावरणाची स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे कमाल तापमानाचा पारा कमी झाला होता . येत्या चार ते पाच दिवसांत कोकण , मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात हलका पाऊस होण्याची शक्यता आहे . विदर्भात उद्या ( शुक्रवारी ) तुरळक सरी पडतील . शनिवारपासून उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close