महाराष्ट्र

मराठा आरक्षणासाठी विद्यार्थ्याची आत्महत्या

बीड — नीट परीक्षेमध्ये कमी गुण मिळाल्याने तसेच आरक्षणाचा मार्ग बंद असल्यामुळे शिक्षण खडतर होऊ शकते त्यामुळे निराश झालेल्या 18 वर्षीय विद्यार्थ्यांने टोकाचे पाऊल उचलत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना केतुरा येथे घडली.


केतुरा येथील विवेक रहाडे या विद्यार्थ्यांने नुकतीच नीट परीक्षा दिली होती. मात्र या परीक्षांमध्ये अपेक्षित गुण न मिळाल्यामुळे तसेच मराठा आरक्षण रद्द झाल्यामुळे मेडिकलला प्रवेश मिळणार नाही. खाजगी संस्थांमध्ये शिकवण्या इतकी घरची आर्थिक परिस्थिती नसल्याच्या नैराश्येतून
विवेकने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मराठा समाजाला आरक्षण मिळालं असतं तर विवेकचा नंबर लागला असता, अशी भावना विवेकच्या आई-वडिलांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सपोनि.सुजित बडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि.योगेश उबाळे करत आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close