देश विदेश

बाबरी मस्जिद विध्वंस प्रकरणी सर्व आरोपी निर्दोष

लखनऊ – बाबरी विध्वंस प्रकरणात बुधवार दि. 30 सप्टेंबर रोजी लखनऊ येथील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे. तसेच घडलेली घटना ही पुर्वनियोजित नव्हती असं देखील न्यायाधीशांनी स्पष्ट केलं आहे.
सेशन ट्रायल नंबर 344/1994, 423/2017 आणि 796/2019 सरकार विरूद्ध पवन कुमार पांडे आणि अन्य वरील प्रकरणात सर्व पक्षांची सुनावणी 16 सप्टेंबरला पूर्ण झाली होती. यानंतर सुरेंद्र कुमार यादव, पीठासीन अधिकारी, विशेष न्यायालय, अयोध्या प्रकरण, लखनऊ यांनी 30 सप्टेंबर 2020 ही निर्णय देण्यासाठी तारीख ठरवली होती. बाबरी विध्वंस प्रकरणात एकुण 49 आरोपी होते, ज्यापैकी सध्या 32 जण हयात आहेत आणि 17 जणांचे निधन झाले आहे. अखेर तब्बल 28 वर्षानंतर न्यायालयाकडून सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे

बाबरी मशिद केसमध्ये हे होते 32 आरोपी
लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, कल्याण सिंह, उमा भारती, विनय कटियार, साध्वी ऋतंभरा, महंत नृत्य गोपाळज् दास, डॉ. राम विलास वेदांती, चंपत राय, महंत धर्मदास, सतीश प्रधान, पवन कुमार पांडेय, लल्लू सिंह, प्रकाश शर्मा, विजय बहादुर सिंह, संतोष दुबे, गांधी यादव, रामजी गुप्ता, ब्रज भूषण शरण सिंह, कमलेश त्रिपाठी, रामचंद्र खत्री, जय भगवान गोयल, ओम प्रकाश पांडेय, अमर नाथ गोयल, जयभान सिंह पवैया, महाराज स्वामी साक्षी, विनय कुमार राय, नवीन भाई शुक्ला, आरएन श्रीवास्तव, आचार्य धर्मेंद्र देव, सुधीर कुमार कक्कड आणि धर्मेंद्र सिंह गुर्जर.

17 आरोपींचे झाले आहे निधन
सीबीआयकडून बनवण्यात आलेल्या 49 आरोपींपैकी अशोक सिंघल, गिरिराज किशोर, विष्णु हरि डालमिया, मोरेश्वर सावें, महंत अवैद्यनाथ, महामंडलेश्वर जगदीश मुनि महाराज, बैकुंठ लाल शर्मा, परमहंस रामचंद्र दास, डॉ. सतीश नागर, बालासाहेब ठाकरे, तत्कालीन एसएसपी डीबी राय, रमेश प्रताप सिंह, महात्यागी हरगोविंद सिंह, लक्ष्मी नारायण दास, राम नारायण दास आणि विनोद कुमार बंसल यांचे निधन झाले आहे.

सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर वेगाने झाली सुनावणी

19 एपिल 2017 ला सुप्रीम कोर्टाने सर्व केस स्पेशल कोर्ट, लखनऊ अयोध्या प्रकरण निकाली काढण्याचे निर्देश दिले आणि म्हटले की, 2 वर्षांच्या आत ट्रायल समाप्त करावी. 21 मे 2017 ला स्पेशल सीबीआय कोर्टाने अयोध्या प्रकरणात नियमित सुनावणी सुरू केली. 8 मे 2020 ला सुप्रीम कोर्टाने निर्देश दिले की, ही ट्रायल 3 महिन्यात संपली पाहिजे आणि 31 ऑगस्ट 2020ची तरीख ठरवण्यात आली. परंतु, ट्रायल समाप्त न झाल्याने तसेच लॉकडाऊनचा विचार करता सुप्रीम कोर्टाने 30 सप्टेंबर शेवटची ट्रायल समाप्त करण्याची तारीख ठरवली. 1 सप्टेंबरला दोन्ही पक्षांची सुनावणी पूर्ण झाली आणि 16 सप्टेंबरला स्पेशल जजने 30 सप्टेंबर 2020 ला जजमेंटची तारीख ठरवली होती.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close