आपला जिल्हा

वरिष्ठांना हाताशी धरून ठाणगे बदली रद्द करण्याच्या तयारीत

बीड — आठ ते दहा दिवसांपूर्वी निरीक्षक पदावर पुरवठा विभागात काम करत असलेले रवि ठाणगे यांची बदली नेकनूर येथे गोदाम रक्षक म्हणून झाली आहे मात्र सध्या बीडमध्ये कमावलेला पैसा ही बदली रद्द करण्यासाठी खर्च करून बीडचा गोदामपाल म्हणून कार्यभार कायम ठेवावा यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
कोरोना संकटकाळात बीडच्या राजकारण्यांना ठाणगे यांनी मोफत धान्य पुरवठा केला होता. हेच धान्य राजकारण्यांनी गोरगरिबाला मोफत वाटत दानशुर कर्णाचा आव आणला. काहीजण सामाजिक कार्यकर्ते म्हणून मिरवले. मात्र ठाणगे च्या मग्रूर वृत्तीमुळे वादाला तोंड फुटल्या गेले. यातूनच त्याचे कृष्णकृत्य देखील चव्हाट्यावर आले गेले. त्याच्या कारभाराचा विवाद वाढल्यानंतर त्याची बदली नेकनुर येथे नऊ दहा दिवसापूर्वी करण्यात आली. परंतु बीडच्या तालुका पुरवठ्यात सर्वेसर्वा बनलेला हा ठाणगे आता कृष्ण कृत्यातून कमवलेल्या पैशाच्या जोरावर मी खुर्ची सोडणार नाही तुम्ही नेकनूर ला जाणार नाही असे वरिष्ठांना ठणकावून सांगत आहे. वरिष्ठांना देखील याचा देणे-घेणे काय पैसे मिळाल्यावर पांघरून घातलं तर हरकत काय अशी भूमिका घेऊन तेदेखील बदली रद्द करण्याच्या तयारीत आहेत. वरिष्ठांचा देखील मेहुणी बायको मिंधा संसार अशी अवस्था झाल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे. बीडच्या गोदाम पालाचा पूर्ण कारभार आपल्याकडे यावा यासाठी ठाणगे लॉबिंग करीत असल्याची विश्वसनीय सूत्राने माहिती दिली आहे. बीडचे तहसीलदार निळे सध्या वाळू उपसा असो की रेशनिंग दोन्हीकडून मिळेल तेवढा माल गोळा करत असल्याचं आता बोललं जाऊ लागला आहे त्यामुळे ठाणगे ची बदली देखील रद्द होते की काय अशी शंका व्यक्त केली जात आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close