आपला जिल्हा

पत्त्याच्या क्लबवर धाड ,दीड लाखाचा ऐवज जप्त

अंबाजोगाई — शहर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे साकुड रोडवर सुरु असलेल्या एका पत्त्याच्या क्लबवर छापा मारून ११ जुगाऱ्याकडून दीड लाखांचा मुद्देमाल जप्त केला. यावेळी चार जुगाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले .तर सात जण पसार होण्यात यशस्वी ठरले.रविवारी संध्याकाळच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली.

अंबाजोगाईपासून जवळच साकुड रोडवरील एका ठिकाणी पत्त्याचा क्लब सुरु असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली होती. सदर माहितीच्या आधारे शहर पोलिसांच्या पथकाने छापा मारला असता त्या ठिकाणी ११ जुगारी तिर्रट नावाचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांना पाहताच त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करून त्यापैकी शेख एजाज उर्फ जल्लू शेख फरहार, धर्मराज गंगाधर वाघमारे, विशाल पंडितराव चाटे आणि सचिन भारत देवकर या चार जुगाऱ्यांना ताब्यात घेतले. तर, नितीन करमचंद लखेरा, दत्ता साखरे, किरण वैजनाथ हेडे, रमेश विठ्ठल भालेकर, सलील भुंगा, आशिष भुट्टे, सलीम दाऊद चौधरी हे सात जुगारी पळून जाण्यात यशस्वी झाले. यावेळी पोलिसांनी घटनास्थळाहून रोख रक्कम, तीन दुचाकी, एक रिक्षा असा एकूण १ लाख ५३ हजार २६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक आर राजा, अपर अधीक्षक स्वाती भोर, एसडीपीओ राहुल धस, पोलीस निरिक्षक सिद्धार्थ गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार सुर्यवंशी, पोलीस कर्मचारी येलमाटे, कुंडगीर, गित्ते, नागरगोजे, घुगे, केदार यांनी पार पाडली.या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सूर्यवंशी यांचा फिर्यादीवरून अकरा जुगाऱ्यावर अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close