कृषीवार्ता

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे तक्रार करण्याचे कृषी विभागाचे पत्र

      • पाहणीनंतर शेतकऱ्यांना न्याय

      • – अँड. अजित देशमुख

बीड — जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झालेले आहे. चौसाळा परिसरातील काही शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्यामुळे त्या ठिकाणी जनआंदोलना मार्फत पाहणी केली होती. यानंतर कृषी विभागाने एक पत्र काढले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी विमा कंपनीला तात्काळ कळवावे, असे आवाहन करून कंपनीचे तालुक्यात कोण कोण प्रतिनिधी आहेत, याची यादी जाहीर केली आहे. त्यामुळे जनतेने लाभ घ्यावा, असे आवाहन जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी केले आहे.

सप्टेंबर महिन्यात झालेल्या सततच्या पावसामुळे पिकांचे अनेक ठिकाणी नुकसान झालेले आहे. नुकसान निदर्शनास येत आहे. ज्या शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभाग घेतला आहे, अशा शेतकऱ्यांनी आता सतर्क झाले पाहिजे.

ढगफुटी, महापूर, अतिवृष्टी, भूस्खलन, चक्रीवादळ, यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले आहे, त्यांनी आपल्या पिकाच्या नुकसानीची माहिती नजीकच्या तालुका कृषी कार्यालय येथे बसलेल्या कंपनीच्या प्रतिनिधीला द्यावी, असे पत्रक जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी काढले असून त्याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा.

त्याच प्रमाणे नुकसान भरपाई बाबतचे अर्ज क्राप इन्शुरन्स एप्लीकेशन चा वापर करून देखील करता येतात. यासाठी ज्यांना जमेल त्यांनी वेबसाइटचा वापर करावा. पण यापेक्षा कृषी विमा कंपनीच्या प्रतिनिधीने प्रत्यक्ष भेट घेऊन अर्ज देऊन पोच घेतली तर शेतकऱ्यांना पुढे भांडण्यासाठी योग्य ठरते. त्यामुळे शेतकऱ्यांनी लेखी अर्ज देऊन पोहोच घ्यावी.

तक्रारी तालुका कृषी अधिकारी आणि विमा कंपनीचे प्रतिनिधी यांना स्वतंत्र देऊन दोघांच्या पोच घ्याव्यात. तालुका कृषी अधिकारी यांचे कार्यालयात असलेल्या विमा कंपनीच्या प्रतिनिधीचे नाव आणि मोबाईल क्रमांक संपर्कासाठी पुढीलप्रमाणे आहेत.

———————-
अ.क्र. तालुका विमा कंपनीच्या प्रतिनिधीचे नाव मोबाईल क्रमांक
————————
बीड — सोनवणे महेश निवृत्ती ८६०५०६८०८८
२ आष्टी — शेख शहानवाज मुक्तार ७७२१८४०१०१
३ पाटोदा — गोल्हार संतोष आश्रूबा ९७६४५५२२०३
४ शिरूर — कंठाळे विशाल हरिभाऊ ८२६१९४८५८८
५ गेवराई —- चिकने धनंजय जगन्नाथ ९७६७२३७५०५
६ धारूर —- देशमुख व्यंकटेश रमेशराव ९०९६६४६५७९
७ वडवणी — देशमुख जिवराज भास्कर ९५९५१४२८९६
८ माजलगाव — मोरे अशोक सुखदेव ८३७९०२६३२२
९ परळी —- फड नागेश्वर विश्वंभर ९०६७९७०१८०
१० केज — केदार ओंकार लहू ९४०५८५७७७७
११ अंबाजोगाई — मुंढे सोपान भानुदास ९०९६६०७९५२
———————

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा. आपल्या पिकाचे झालेले नुकसान सहन करण्यापेक्षा विमा कंपनीकडे विमा उतरविला असल्यामुळे नुकसान भरपाई प्राप्त करून घ्यावी. यासाठी दक्ष राहून पाठपुरावा करावा. जिल्हाधिकारी यांनी याची तात्काळ दखल घेतल्याबद्दल त्याचे जन आंदोलनाने आभार मानले असल्याचे अँड. देशमुख यांनी म्हंटले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close