आपला जिल्हा

परळीतील अशोक नगर भागात माणसं रहात नाहीत काय ? जनतेच्या आरोग्याशी खेळ कूठपर्यंत ?

परळी — शहरातील अशोक नगर भागांमधील रस्त्याचे काम गेल्या अनेक वर्षापासून रखडले असून येथील नागरिकांचा आजपर्यंत फक्त मतांपूरताच वापर केला आहे.नाल्यांच पाणी रस्त्यावर झालेल्या मोठमोठ्या खड्यांमध्ये साचून परिसरात दूर्घंदी पसरली आहे. महामारी च्या काळात येथील जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे.


 या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना रस्त्याने चालता सुद्धा येत नसून सर्व नाल्यांचे पाणी अशोक नगर मध्ये येते व काही कालावधी नंतर पाणी घरात सुद्धा आल्याशिवाय राहणार नाही, असे स्थानिक लोकांनी म्हटले आहे.


अशोक नगर मध्ये नाल्या, रस्ता नसल्यामुळे इथल्या नागरिकांना खूप त्रास होत असल्याने आरोग्याचा प्रश्न बिकट बनला आहे.लहान लहान मुला बाळांना व महिलांना चालता सुद्धा येत नाही, घाण पाणी साचून पाण्याची दुर्गंधी पसरत आहे, स्थानिक लोकांचे आरोग्य धोक्यात आले असून स्थानिक प्रशासन व नगर सेवक याकडे मात्र दुर्लक्ष करत असल्याचा आरोप येथील स्थानिकांनी केला आहे. एकंदरच या भागातील विकास रखडलेला असल्यामुळे येथे सुद्धा माणसेच राहतात असं म्हणण्याची वेळ आली आहे.
या भागात काही ठिकाणी साचलेल्या पाण्यामध्ये पडून लहान मुलांना दुखापत सुद्धा होत आहेत तरी नगर परिषद इथल्या नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून तात्काळ स्वच्छता करतील का असा प्रश्न निर्माण झाला आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close