आपला जिल्हा

पुरवठ्यातल्या ठाणगेची दांडगाई कायम; बदली होऊनही पदभार सोडायला तयार नाही

बीड — पुरवठा विभागामध्ये दोन तीन पदांच्या जबाबदाऱ्या पार पडत असलेल्या रवी ठाणगे ची बदली नेकनूर येथे गोदाम रक्षक म्हणून झाली असली तरी ते पुरवठा विभागातील कुर्चीला फेविकॉल लावल्यासारखं चुकून बसले आहे आठ दिवसापासून त्यांनी पदभार सोडला नाही याबरोबरच वरिष्ठांसोबत डिलींग करून बदली रद्द करायच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली आहे.
पुरवठा विभाग मध्ये निरीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडत असलेले रवि ठाणगे हे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. पुरवठा विभागात त्यांची सुरू असलेली मग्रुरी अनेकांना जिव्हारी लागत होती. उलटा चोर कोतवाल को डाटे या म्हणीचा प्रत्यय त्यांच्याकडे पाहून प्रत्येकाला येत होता जनसेवक आसून जनतेवरच धावून जाणाऱ्या या माजी सैनिक असलेल्या या व्यक्तींने पुरवठा विभाग पोखरून काढला. विवाद वाढल्यानंतर त्यांची बदली नेकनूर येथे गोदाम रक्षक म्हणून करण्यात आली या गोष्टीला आठ दिवसाचा कालावधी उलटून गेला आहे. मात्र असं असतानासुद्धा बीडचा निरीक्षक पदाचा पदभार ते सोडायला अद्याप तयार नाहीत. पिंपळनेर व बीडच्या गोदाम पालचा कारभार यांच्याकडेच आहे. याची देखरेख त्यांनी खाजगी व्यक्ती नियुक्त करून त्यांच्याकडून करून घेतली जात आहे. एकंदरच अशा व्यक्तिमत्त्वाला पाठबळ नेमके पुरवठा अधिकारी खाडे यांचे आहे की तहसीलदार निळे यांचे आहे असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.या अधिकाऱ्यांच्या संगनमताने जिल्हाधिकाऱ्यांची दिशाभूल होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. बदली होऊन आठ दिवसांचा कालावधी उलटून गेला असला तरी वाहत्या गंगेत हात धुवायचे सोडून ओसाड गावची पाटील की कशाला करायची म्हणून ते पदभार सोडायला अद्याप तयार नाहीत. वरिष्ठ अधिकाऱ्यांना हाताशी धरून नंबर 2 ने मिळवलेला पैसा बदली रद्द करण्यासाठी खर्च करत असल्याचे सांगितले जात आहे. लॉकडाउन काळामध्ये लोकप्रतिनिधींना त्यांनी जनतेला वाटप करण्यासाठी धान्य उपलब्ध करून दिले होते. या धान्याच्या जोरावरच लोकप्रतिनिधींनी आम्ही दानशूर कर्णाचे वारस आहोत अशी टिमकी वाजवली होती. आता या उपकाराची परतफेड ठाणगे करून घेण्याच्या तयारीत असल्याचं देखील बोलले जात आहे..

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close