महाराष्ट्र

कृषी विधेयक राज्यात लागू होणार नाही; जनशक्ती युवा संघटनेच्या मागणीला यश

पुणे — केंद्र सरकारने तीन कृषी विधेयक मंजूर केली असून त्यावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली आहे. मात्र जनशक्ती युवा संघटनेने हे विधेयक महाराष्ट्रात लागू करू नये अशी मागणी केली होती त्याला यश मिळाले असून राज्यात शेतकरी व कामगार विधेयकाची अंमलबजावणी होणार नसल्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे.

केंद्रातील मोदी सरकारने शेतकरी विधेयक मंजूर करून घेतले. त्यानंतर देशभरातून या विधेयकाला शेतकरी संघटनांनी विरोध केला. हे विधेयक शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांचे हित जोपासणारे असल्यामुळे जनशक्ती युवा संघटनेने संपूर्ण महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात जिल्हाधिकारी कृषी अधिकारी , आयुक्त यांना भेटून निवेदन दिले या निवेदनामध्ये किमान महाराष्ट्रात तरी हे विधेयक लागू करू नये अशी मागणी उचलून धरली होती. शेवटी संघटनेच्या या प्रयत्नाला यश आले असून राज्यातील महाविकास आघाडी सरकारने शेतकरी हित लक्षात घेता हे विधेयक लागू करण्यात येणार नसल्याची ची रचना केली. तसेच कामगार कायद्याची अंमलबजावणी होऊ नये यासाठी पिंपरी चिंचवड जनशक्ती युवा संघटनेचे अध्यक्ष आकाश भोसले, उपाध्यक्ष अजय गिरी सरचिटणीस अंकित कदम, सेक्रेटरी गणेश साळवी यांनी महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close