देश विदेश

कृषी विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी कायद्यात झाले रूपांतर

नवी दिल्ली — मोदी सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांकडून देशव्यापी आंदोलन करण्यात आले होते. मात्र संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मंजूर झालेल्या तीन कृषी विधेयकांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज (२७ सप्टेंबर) मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता या तिन्ही विधयकांचे कायद्यात रूपांतर झाले आहे.

दरम्यान पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी ही विधेयक मागे घेण्याची मागणी केली होती. तर राष्ट्रपतींनी या विधेयकांवर स्वाक्षरी करू नये अशी विरोधकांची मागणी होती. मात्र राष्ट्रपतींनी या तिन्ही विधेयकांवर स्वाक्षरी करत मंजुरी दिली आहे. कृषी विधेयकावरून नरेंद्र मोदी सरकारला मोठा धक्का बसला आहे. अकाली दलाच्या मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी राजीनामा दिला आहे. या निर्णयानंतर अकाली दलानं मोठा निर्णय घेतला आहे. गेल्या अनेक दशकांची मैत्री तोडत पक्षाने केंद्रातल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधून (NDA) बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेनंतर भाजपशी काडीमोड घेणारा अकाली दल हा भाजपचा सगळ्यात जवळचा मित्र होता.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close