आरोग्य व शिक्षण

​कोरोनातून बऱ्या झालेल्यांना पुन्हा का होतोय संसर्ग ? ICMR कडून तपास सुरू​

नवी दिल्ली — सध्या संपूर्ण जग कोरोनाशी सध्या लढा देत असून यातून मुक्त होण्यासाठी लस तयार करण्यासाठी प्रयत्नशील आहे. सध्या शर्यतीत रशियाची लस आघाडीवर आहे.त्याच वेळी भारतात कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण ८० टक्क्यांवर पोहोचले आहे. पण कोरोनामुक्त झालेल्या अनेक नागरिकांना पुन्हा संसर्ग झाल्याचं वृत्त आहे. भारतातील नागरिक कळप रोग प्रतिकारशक्तीपासून बरेच दूर असल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन म्हणाले.

 

सेरो सर्वेक्षणचा दुसरा अहवाल
भारतीय नागरिक कळप रोगप्रतिकारक शक्ती पासून खूप दूर आहेत त्यामुळे सावधानी बाळगत नियमांचं पालन गांभीर्याने करण्याची गरज निर्माण झाली आहे. कोरोना मुक्त झालेल्या व्यक्तीला पुन्हा संसर्ग का होत आहे हे पाहण्यासाठी आयसीएमआर सध्या तपास करत आहे. मात्र सध्या अशा रुग्णांची संख्या कमी असल्याच हर्षवर्धन यांनी सिरो सर्वेक्षणातील दुसर्‍या अहवालावरून स्पष्ट केल आहे. दरम्यान
सरकारने रेमेडीसिवर व प्लाजमा थेरपी ला प्रोत्साहन देण्यात येणार नाही असं स्पष्ट करत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
खासगी रुग्णालयांनाही अशा उपचारांचा नियमित वापर करू नये असा सल्ला देण्यात आला आहे, असं देखील हर्षवर्धन यांनी सांगितल आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close