महाराष्ट्र

आयोगाच्या परीक्षा केंद्र बदलण्याची उमेदवारांना संधी::माजीमंत्री जयदत्त क्षीरसागरांच्या पाठपुराव्याला यश

बीड — महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा पूर्व व संयुक्त पूर्व परीक्षा केंद्र बदलण्यासाठी उमेदवारांना आता संधी मिळणार असून माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी उमेदवारांच्या अडचणी लक्षात घेऊन परीक्षा केंद्र बदलण्याची संधी देण्यात यावी अशी मागणी केली होती त्यांच्या या मागणीला यश आले असून यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र बदलण्याची मुभा मिळणार आहे

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परिक्षा सन 2020 मधील अंदाजित वेळापत्रकानुसार राज्यसेवा पूर्व परीक्षा 5 एप्रिल 2020 तसेच महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा दिनांक 2 मे 2020 रोजी महाराष्ट्रातील 37 जिल्हा केंद्रावर आयोजित करण्यात आल्या होत्या कोरणार विषाणूच्या प्रादुर्भावामुळे व लोक डाऊन मुळे सदर परीक्षा ऐनवेळी पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आयोगामार्फत आयोजित परीक्षा तातडीने घेण्याबाबत व सुधारित वेळापत्रकानुसार राज्यसेवा पूर्व परीक्षा सप्टेंबर मध्ये नियोजित करण्यात आल्या होत्या या परीक्षांसाठी उमेदवारांना अडचण निर्माण झाली होती त्यामुळे अनेक उमेदवारांनी माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्याशी याबाबत भेट घेऊन अडचणी सांगितल्या होत्या,बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील उमेदवारांना मुंबई पुणे व मोठ्या शहरात जावे लागत होते,कोरोनाच्या काळात प्रवासाची सोय नव्हती व त्या ठिकाणी राहण्याची जेवणाची अडचण निर्माण झाली असती या सर्व अडचणी शासनदरबारी पाठपुरावा करून सोडवाव्यात अशी मागणी केली होती त्यानुसार 16 ऑगस्ट 2020 रोजी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा पूर्व व संयुक्त पूर्व परीक्षा केंद्र बदलण्याबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे निवेदन देऊन ही मागणी केली होती तसेच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील निवेदन देऊन उमेदवारांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली होती त्यानुसार आयोगाने त्यांच्या मागण्या मंजूर केल्या असून परीक्षेचे नव्याने वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 11 ऑक्टोबर 2020 रोजी व महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020 या 22 नोव्हेंबर 2020 रोजी आणि महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 2020 आता 1 नोव्हेंबर 2020 रोजी घेण्यात येणार आहे या सर्व परीक्षांसाठी उमेदवारांना परीक्षा केंद्र बदलण्याची मुभा देण्यात आली असून त्यामुळे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने त्यांच्या महसुली मुख्यालयाचे ठिकाण निवडता येणार आहे पसंतीनुसार जिल्हा केंद्र निवडण्याची संधी देण्याचा निर्णय आयोगाने मंजूर केला असून अनेक उमेदवारांनी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या प्रयत्नाला यश आल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे याबाबत आयोगाने एक पत्र पाठवून कळवले आहे

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close