आपला जिल्हा

हिंगणी चे सरपंच अंकुश गोरे यांना मातृशोक!

चौसाळा — येथून जवळच असलेल्या हिंगणी बुजुर्ग येथील सरपंच अंकुश गोरे यांच्या मातोश्री रूक्‍मीनबाई बापूराव गोरे यांचे शुक्रवारी संध्याकाळी अल्पशा आजाराने निधन झाले.
रूक्‍मीनबाई गोरे या अत्यंत मनमिळाऊ स्वभावाच्या असल्यामुळे सर्व परिचित होत्या. गेल्या काही दिवसापासून त्या आजारी होत्या. मृत्युसमयी त्यांचे वय 70 होते. शुक्रवारी संध्याकाळी त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्या पश्चात एक मुलगी, दोन मुले सुना नातवंडे असा परिवार आहे. शनिवारी 26 सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता त्यांच्यावर हिंगणी बुद्रुक येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. गोरे कुटुंबियांच्या दुःखात ” सह्याद्री माझा ” परिवार सहभागी आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close