आपला जिल्हा

ग्रामपंचायतींना थर्मल गन, पल्स ऑक्सीमीटर खरेदी करण्याचे जि.प.चे आदेश

बीड —ग्रामीण भागात पसरत असलेल्या कोरोना संक्रमणाला रोखण्यासाठी बीड जिल्हा परिषदेने आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना आता थर्मल गन, पल्स ऑक्सीमीटर खरेदी करण्याच्या सूचना बीड जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने पत्राद्वारे गटविकास अधिकार्‍यांना गुरुवारी दिल्या आहेत. खरेदीसाठी दर निश्चित करण्यात आले आहेत. त्यामुळे अनियमितता होण्याची शक्यता कमी असली तरीही तसे झाल्यास सरपंच, ग्रामसेवकावर थेट कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला आहे.

जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाकडून देण्यात आलेल्या पत्रात म्हटले की, बीड जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी उपलब्ध असलेल्या 14 व्या व 15 व्या वित्त आयोगातील निधीमधून थर्मल गन, पल्स ऑक्सीमीटर खरेदी करावे. ही खरेदी करण्यासाठी नियमावली देखील सोबत दिली असून त्यात म्हटल्याप्रमाणे, साहित्य गुणवत्तापूर्ण व ठरवून दिलेल्या मानकानुसारच खरेदी करावे. ग्रामपंचायतने खरेदीचा साठा नोंदवहीत घेऊन ते अंगणवाडी सेविकांना वाटप करावे. यात अनियमितता आढळून आल्यास नियमानुसार थेट सरपंच व ग्रामसेवकांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close