आपला जिल्हा

डीसीसी बँकेकडून सिबिल च्या नावाखाली शेतकर्‍यांची अडवणूक थांबवा-भाई दत्ता प्रभाळे

वडवणी — डीसीसी बँकेमध्ये सिबिल च्या नावाखाली पीक कर्जासाठी शेतकऱ्याची अडवणूक केली जात आहे 30 सप्टेंबर ही शेतकऱ्यांसाठी पीक कर्जासाठी शेवटची तारीख आहे. त्यामुळे शेतकरी आणखी धोक्यात आला आहे. बँकेकडून कर्ज उपलब्ध होईल की नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे.

जिल्हाधिकाऱ्यानी पीक कर्जासाठी अडवणूक करणाऱ्या बँकेच्या विरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले असताना देखील या बँका आदेशाचे पालन न करता शेतकऱ्यांची अडवणूक करत आहेत. एक तर पावसाने जिल्ह्यात थैमान घातल्याने हाताला आलेली पिक पावसामुळे पूर्ण वाया गेली असल्यामुळे शेतकरी वर्ग संकटात आहे. तर दुसरीकडे, शेतकऱ्यांना पीक कर्ज 30 तारखे नंतर उपलब्ध होणार नाही असे असताना देखील शेतकऱ्यांच्या सिबिल च्या नावाखाली डीसीसी बँकेत कडून शेतकऱ्यांची अडवणूक होत असल्याची पत्र शेतकरी कामगार पक्षाचे भाई मोहन गुंड,अॅड संग्राम तुपे,ऍड,नारायण गोले पाटील,दत्ता प्रभाळे,भिमराव कुटे, यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे जिल्ह्याचे डी डी आर यांच्या कडे लेखी तक्रार केली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close