क्राईम

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर  बलात्कार

परळी — लग्नाचे आमिष दाखवून एका युवकाने आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या १४ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची घटना परळी तालुक्यात उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परळी तालुक्यात खळबळ माजली आहे. याप्रकरणी परळी ग्रामीण ठाण्यात त्या तरुणावर पोक्सोसह बलात्काराचा गुन्हा नोंदविण्यात आला.

पिडीत मुलीने दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे आहे कि, ती मुळची परळी शहरातील असून आई-वडिलांचे भांडण झाल्याने सात वर्षापासून आई आणि भावासह आजोळी परळी तालुक्यातील गावी राहते. या दरम्यान तिची ओळख बालाजी विष्णू दहिफळे या तरुणासोबत झाली. सतत भेटीतून त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले आणि बालाजीने तिला नेहमी लग्नाचे आमिष दाखविले. दि. १५ जून रोजी दुपारी पीडिता मैत्रिणीला भेटून घराकडे निघाली असता वाटेत तिला बालाजी भेटला आणि तो तिला स्वतःच्या कपड्याच्या दुकानात घेऊन गेला. तिथे पिडीतेला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर प्रत्येक भेटीत बालाजीने झालेली प्रकाराबद्दल कोणाला काहीच सांगायचे नाही असे पिडीतेला बजावले. दि. १५ ऑगस्ट रोजी दुपारी बालाजीने पुन्हा पिडीतेवर त्याच्या झेरॉक्सच्या खोलीत अत्याचार केला. दरम्यान, मंगळवारी (दि. २२ सप्टेंबर) रोजी पिडीतेच्या पोटात दुखू लागल्याने तिला आईने अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात दाखल केला आणि हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पिडीतेच्या फिर्यादीवरून बालाजी विष्णू दहिफळे याच्यावर बुधवारी (दि.२३) परळी ग्रामीण ठाण्यात बलात्कारासह बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक जिरगे हे करत आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close