आपला जिल्हा

गुरुवारी सुद्धा कोरोना रुग्णसंख्या द्वि शतकाच्या उंबरठ्यावर

बीड — जिल्ह्यात गुरुवारी देखील कोरोना रुग्णांची संख्या दोनशेच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचली. रोज अहवालामध्ये रुग्ण संख्या वाढत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. 994 जणांच्या अहवालामध्ये 194 कोरोना बाधित रुग्ण सापडले आठशे जणांचे अहवाल निगेटिव आले आहेत.
अंबाजोगाई तालुक्यामध्ये 27 रुग्ण सापडले असून धानोरा बुद्रुक मध्ये चार लोखंडी सावरगाव श्रीनगर कॉलनी येथे मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडले. आष्टी तालुक्यामध्ये 26 रुग्ण सापडले यामध्ये सातपुते वस्ती चिंचपूर पंडित नेहरू शाळेमागे आष्टी भागवत कॉलनी गुट्टे हॉस्पिटल शेजारी तसेच आष्टी पोलिस ठाण्यात एक कर्मचारी पॉझिटिव आढळून आला आहे. बीडमध्ये 37 आकडा गाठला असून चौसाळा पालसिंगण, जिजामाता चौक शाहूनगर या ठिकाणी मोठ्या संख्येने रुग्ण सापडले . एका दैनिकाच्या पत्रकाराचा अहवाल देखील पॉझिटिव आला आहे. धारूर तालुक्यामध्ये नऊ रुग्ण सापडले असून उदयनगर पाटील गल्ली याठिकाणी आणि जास्त रुग्ण सापडले. गेवराई मध्ये ते 13 रुग्ण सापडले चकलांबा ताकडगाव पैठण धारवंटा संगम मित्र नगर औरंगपूर कुकडा या ठिकाणी रुग्ण सापडले. केजमध्ये पंधरा रुग्ण सापडले असून चिंचोली माळी अरणगाव होळ युसुफ वडगाव याठिकाणी रुग्ण संख्या अधिक आढळून आली. माजलगाव मध्ये रुग्ण सापडले मंजरथ रिधोरी शुगर वाडी याठिकाणी हे रुग्ण आढळले. परळी तालुक्यामध्ये 31 रुग्ण सापडले यामध्ये शिवाजीनगर हरदास नगर दादाहरी वडगाव शास्त्रीनगर जलालपूर, इंजेगाव इंदपवाडी भागात रुग्ण सापडले पाटोदा मध्ये दहा रुग्ण सापडले असून महासांगवी डोंगर किनी पारगाव घुमरा सुपा येवलवाडी याठिकाणी पॉझिटिव्ह रुग्ण सापडले शिरूर मध्ये निमगाव मध्ये जास्त रुग्ण सापडले तर वडवणी मध्ये हे रुग्ण सापडले असून दत्तमंदिर मामला दुकडेगाव गणपती मंदिर खळवट लिमगाव याठिकाणी देखील रुग्ण सापडले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close