देश विदेश

कोरोनाने घेतला केंद्रीय मंत्र्याचा बळी; सुरेश अंगडी यांचं निधन

नवी दिल्ली — केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं कोरोना मुळे निधन झालं. पहिल्यांदाच भारताचे केंद्रीय मंत्री कोरोना संक्रमणाला बळी पडले आहेत. अंगडी यांच्यावर गेले 2 आठवडे उपचार सुरू होते. बेळगावचे खासदार असलेले सुरेश अंगडी पहिल्यांदाच मोदींच्या मंत्रिमंडळात मंत्रिपद भूषवत होते. 11 सप्टेंबरला सुरेश अंगडी यांनी ट्विट करून आपल्याला कोरोना चा संसर्ग झाल्याची माहिती दिली होती.कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर अंगडी यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

सुरेश अंगडी 2004 पासून बेळगावमधून भाजपच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडून येत त्यांची प्रकृती गंभीर होती. उपचारांना प्रतिसाद मिळत नव्हता. ते 65 वर्षांचे होते. सुरेश अंगडी यांच्या मागे पत्नी आणि दोन मुली आहेत.

सुरेश अंगडी 2004 पासून बेळगावमधून भाजपच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडून येत आहेत. त्यांना प्रथमच केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळालं होतं.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close