आपला जिल्हा

बीड जिल्हा कोरोना 197

बीड — बुधवारी कोरोना ने चांगलीच आकडेवारी गाठली आहे.1252 जनांच्या अहवालामध्ये तब्बल 197 रुग्ण सापडले आहेत. या अहवालामध्ये देखील ग्रामीण भाग व तरुणांना अधिक लागण झाल्याचे चित्र पहावयास मिळाले.1055 संशयितांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
जिल्ह्यातील सर्वच तालूक्यामध्ये कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याने चिंतेत अधिक भर पडली आहे. अंबाजोगाई तालुक्यामध्ये 28 रुग्ण सापडले. आष्टी मध्ये वीस रुग्ण सापडले आहेत.बीड तालुक्याची रुग्णसंख्या अर्धशतक पार करत 52 वर जाऊन पोहोचली आहे. धारूर मध्ये 14 रुग्ण सापडले तर गेवराई तालुक्यामध्ये फक्त आठ रुग्ण सापडले आहेत. केज तालुक्यामध्ये सतरा रुग्ण सापडले असून माजलगाव तालुक्यामध्ये देखील याच आकड्याची बरोबरी झाली आहे. परळी तालुक्यातील रुग्णांचा आकडा आज वाढला असून तो 21 वर जाऊन पोहोचला आहे. पाटोदा व शिरूर तालुक्यात देखील ग्रामीण भाग असून सुद्धा संक्रमित रुग्णांची संख्या कमी होत नाही. पाटोदा मध्ये 12 व शिरूर तालुक्यात चार पॉझिटिव्ह आले आहेत. वडवणी तालुक्यांमध्ये मात्र हा आकडा 4 वरच आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close