आपला जिल्हा

जिल्हाधिकार्‍यांच्या उपस्थितीत माजलगांवात रूग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा पार पडला

माजलगांव — covid-19 च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे माजलगाव शहरात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण सापडत आहेत.अशा परिस्थितीत सामाजिक जाणिवेतून माजलगांव तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्षांच्या कल्पनेतून रुग्णवाहिका देण्याचा विचार समोर आला, माजलगांव शहरातील नागरिकांना याचा लाभ ना नफा ना तोटा या तत्वावर देण्यात येत आहे. हा रूग्णवाहिका चा लोकार्पण सोहळा दि २१ सप्टेंबर सोमवारी श्री सिध्देश्वर विद्यालय माजलगांव येथे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते संपन्न झाला

.या कार्यक्रमास जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांच्या शुभहस्ते उदघाटन उद्घाटन करण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बीड जिल्हा व्यापारी महासंघाचे व महाराष्ट्र चैंबर आँफ काँमर्स चे वरिष्ठ उपाध्यक्ष मा.सत्यनारायणजी लाहोटी हे होते.तर प्रमूख पाहुणे म्हणून भारतीय शिक्षण प्रसारक संस्थे अध्यक्ष नितीनजी विजय कुमार शेटे(लातूर)हे उपस्थित होते. वैद्यनाथ बँकेचे अध्यक्ष आशोकशेठ जैन हे या कार्यक्रमात सहभागी झाले.या ऑक्सिजन अॅम्बुलन्ससाठी श्री सिध्देश्वर शैक्षणिक संकुल तसेच दि वैद्यनाथ अर्बन को ऑप बॅंक चे मा.अशोकशेठ जैन याचे योगदान महत्त्वाचे आहे.तसेच माजलगांव तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुरेंद्र रेदासनी यांच्या प्रयत्नाला यश आले.सदर रूग्णवाहिकाची किंमत(१७लाख ५५ हजार रुपये)असून यामध्ये सुरेंद्र रेदासनी,धनराज बंब, संतोष अब्बड,शशिकिरण गडम यांचे योगदान मिळाले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close