महाराष्ट्र

मराठा समाजासाठीचे मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले महत्त्वाचे 9 निर्णय

मुंबई — आज मंत्रिमंडळाच्या झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत मराठा समाजाच्या प्रश्नासंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली साडेतीन तास चाललेल्या या बैठकीस मराठा आरक्षणाबाबत मुख्यत्वे चर्चा झाली . या बैठकीनंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख , काँग्रेसचे मंत्री अशोक चव्हाण आणि शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत एक पत्रकार परिषद पार पडली . यामध्ये अशोक चव्हाण यांनी मंत्रिमंडळ बैठकीत मराठा समाजासाठी घेण्यात आलेल्या महत्त्वाच्या 9 निर्णयांची माहिती दिली.

यासोबतच राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावर दिलेली स्थगिती उठवण्यासाठी कशाप्रकारे प्रयत्न करणार असल्याचीही माहिती दिली . आजच राज्य सरकारच्या वतीने अंतरिम स्थगिती उठवावी म्हणून सर्वोच्च न्यायालयात अर्ज केल्याची माहितीही अशोक चव्हाण यांनी दिली . दरम्यान , मराठा समाजातील विद्यार्थ्यांना , युवकांना दिलासा देण्यासाठी आज मंत्रिमंडळात सखोल चर्चा झाली . यामध्ये मराठा समाजासाठी सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतलेत .
आज मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने घेतलेले ९ महत्त्वाचे निर्णयः
1. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी ( EWS ) साथीचा लाभ SEBC प्रवर्गाती उमेदवाराला देण्यात येईल
2. राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना पूर्वी SEBC विद्यार्थ्यांना लागू करण्यात आली होती . ती आता EWS ला देखिल लागू होणार . राज्य शासनाने ६०० कोटींचा निधी केला मंजूर
3. डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना ही पूर्वी SEBC साठी लागू होती तीही आता EWS प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी लागू होईल . त्यासाठी ८० कोटींची तरतूद
4. उच्च आणि तंत्र शिक्षण विभागामार्फत डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह योजनेअंतर्गत शासकीय आणि इतर इमारतीत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांकरता नोंदणीकृत संस्थांना देण्याची योजना राबवण्यात येते , ही योजना अधिक गतिमान करण्यात येईल 5. सारथी संस्थेसाठी भरीव निधी आणि मनुष्यबळ उपलब्ध करून दिलं जाईल . यावर्षासाठी १३० कोटींची मागणी केलेली आहे . ते त्यांना देण्यात येतील आणि यावर काही निधी लागल्यास सरकारकडून उपलब्ध केला जाईल

6. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडे बेरोजगारांना व्यवसायासाठी आर्थिक मदत देण्यात येतेय . यासाठीच भागभांडवल म्हणून ४०० कोटींची वाढ करण्यात येत आहे . 7. मराठी क्रांती मोर्चात मृत्युमुखी पडल्याच्या वारसांना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात नोकरी दिली जाईल
8. मराठा मोर्चा काढण्यासंदर्भातील आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे ( पोलिसांवरील हल्ले सोडून ) मागे घेण्याची कारवाई सुरु , एक महिन्यात गुन्हे मागे घेण्यात येतील
9. SEBC साठीचे सर्टिफिकेट देण्यास कोणतीही स्थगिती नाही . SEBC प्रमाणपत्र देण्यात येतील . मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठा समाजातील विद्यार्थी तसेच युवकांना दिलासा देण्यासाठी निर्णय घेण्यात आले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close