महाराष्ट्र

6 जिल्ह्यात रेड अलर्ट, मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई- कोकणसह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे, असा इशारा हवामान खात्याने दर्शवला आहे.त्यात काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्टसुद्धा जारी करण्यात आला आहे.

रायगड, सिंधूदूर्ग, रत्नागिरी, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांध्ये अति मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करत रेड अलर्ट दिला आहे. सिंधुदुर्गातही अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय पुणे, कोल्हापूर व सातारा येथे मंगळवारी अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तसेच पालघर, मुंबई, ठाणे येथे आज विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्यातील इतर जिल्ह्यात देखील कमी-जास्त प्रमाणात पावसाची रिमझिम असणार आहे.पुढील 24 तासामध्ये दक्षिण कोकण, गोवा भागात मुसळधार पावसाचा अंदाज तर मुंबईसह ठाणे काही भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज मुंबई, ठाणे, सातारा, कोल्हापूर, रायगड, पुणे जिल्ह्यात काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तविला आहे. मुंबई-ठाणे, नवी मुंबई आणि उपनगरांध्ये हलक्या स्वरुपाचा पाऊस पडणार आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close