महाराष्ट्र

कळे गावाने अनुभवलं कोरोनाच क्रौर्य; आई व दोन मुलांचा एकाच दिवशी मृत्यू

कोल्हापूर — नातेवाईकाचा मृत्यू झाला त्याच्या अंत्यविधीला एकत्र आल्याने घरातील अनेकांना कोरोनाची लागण झाली. लक्षणे दिसू लागल्यामुळे घरातील सर्वच रुग्णालयात दाखल झाले मात्र शनिवारी एकाच घरातील दोन मुलांसह आईचा कोरोना ने बळी घेतल्याची घटना पन्हाळा तालुक्यातील कळे येथे घडली.

कळे येथील देसाई कुटुंबाचा वाळू विक्रीचा व्यवसाय आहे.एका नातेवाईकाचे कोरोना ने निधन झाल्यामुळे याचा धक्का त्याच्या आईला बसल्यामुळे गेल्या आठवड्यात तिचे निधन झाले. यावेळी तिच्या अंत्यविधीला देसाई कुटुंब हजर होते. देसाई कुटुंबातील सर्वांना येथेच बाधा झाली.लक्षणे दिसू लागल्यानंतर त्यांनी काही दिवस घरातच उपचार घेतले त्याला प्रतिसाद न मिळाल्यामुळे शेवटी कोल्हापुरातील विविध रुग्णालयात पती-पत्नी यांच्यासह तीन मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले उपचार सुरू असताना पहाटे आई मालुबाई देसाई व मुलगा दीपक देसाई यांचा मृत्यू झाला. दुपारी दुसरा मुलगा सागरचाही कोरोनामुळे बळी गेला. त्यामुळे या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, एका मुलावर उपचार सुरू असून वडिलांची प्रकृती देखील चिंताजनक आहे. एकाच दिवशी एकाच घरातील तिघांचा अंत झाल्याने गावात शोककळा पसरली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात करोनाचा कहर प्रचंड वाढला आहे. शनिवारी दिवसभरात १०२९ जणांना करोनाची बाधा झाली. यामुळे आतापर्यंतचा करोना बाधितांचा आकडा ३९ हजारावर गेला आहे. दिवसभरात २५ जणांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंतचा आकडा बाराशेवर पोहोचला आहे. कागल येथे एकाच दिवशी पती व पत्नीचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर कोरोनाचे बळी वाढत असल्याने जिल्ह्यात चिंता व्यक्त केली जात आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close