आपला जिल्हा

अतिवृष्टीमुळे बळीराजा संकटात; सोयाबीन तूर कापूस कापसाची पिके पाण्यात

बीड — कायम दुष्काळाच्या सावटाखाली असलेल्या बीड जिल्ह्यात यंदा अतिवृष्टी झालेली आहे. मागील चार दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे बीड जिल्ह्यातील सोयाबीन, तूर, कापूस व इतर पिके पाण्याखाली गेल्याचे चित्र बीड जिल्ह्यात निर्माण झाले आहे. कोरोनाच्या महामारी मध्ये आर्थिक संकटात सापडलेला बळीराजा पुन्हा एकदा अस्मानी संकटामुळे मेटाकुटीला आला आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई घेण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

जिल्ह्यात शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसाने काढणीला आलेल्या सोयाबीन,बाजरी, उडीद पिकाचे प्रचंड नुकसानझाले आहे,तर कापसाला पाणी लागल्याने पिवळा पडून पाते गळ झाली आहे. यामुळे कापसाचे देखील पीक गेल्यात जमा आहे. बीड जिल्ह्यातील काही भागात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्याची जमीन देखील खरडून वाहून गेली आहे. त्यामुळे जमिनीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देणे आवश्यक झाले आहे.

जिल्ह्यात सोयाबीनचा पेरा दीड लाख हेक्टर वरती झालेला आहे. पीक देखील बहारदार आल्याने शेतकरी समाधान व्यक्त करत होता. मात्र गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पिकाचे होत्याचं नव्हतं झालंय. यातच वादळी वारा असल्याने उसाचे देखील प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. जिल्ह्यात जास्तीच्या पावसाने सोयबिन पीक धोक्यात आले आहे. पिकांमधून पाणी वाहत असताना चित्र बीड तालुक्यातील चौसाळा नेकनूर मांजरसुंबा शिवारात दिसत आहे.
सोयाबीन बाजरी काढून टाकलेली आहे. त्या काढून टाकलेल्या बाजरीमध्ये जास्त पाऊस झाल्याने पूर्ण पीक हातातून गेल्याचे शेतकरी सांगत आहेत. शेतकरी सचिन कोठुळे त्यांनी सांगितले आहे. सतत कोरडया दुष्काळाचा सामना करणाऱ्या बीड जिल्ह्यात यावर्षी ओला दुष्काळ सतावत आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने काढून घेतल्याने पुन्हा एकदा नवं संकट ओढवल आहे. पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी , अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राहुल वायकर यांनी केली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close