आपला जिल्हा

माजलगाव मध्ये कोरोनाग्रस्ताचा मृतदेह 10 तास एकाच ठिकाणी

माजलगाव — शुक्रवारी रात्री दहा वाजता कोरोना बाधित व्यक्तीचा मृत्यू झाला याची सर्व विभागात कल्पना देऊन देखील प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यामुळे मृतदेह तब्बल दहा तास एकाच जागेवर पडून राहिलाया प्रकारामुळे नातेवाईकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. याप्रकरणी बेजबाबदार अधिकाऱ्यांना जाब विचारणार असल्याची माहिती तहसीलदार प्रतिभा गोरे यांनी दिली आहे.

येथील रुग्णालयामध्ये कोविड रुग्णाचा शुक्रवारी रात्री मृत्यू झाला.याबाबत रुग्णालय प्रशासनाने व नातेवाईकांनी आरोग्य विभाग महसूल व नगरपालिकेला यासंदर्भात माहिती दिली.मृत व्यक्तीचा अंत्यविधी लवकर होणे गरजेचे असताना देखील संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष करून मृतदेह सकाळी आठ वाजेपर्यंत तसाच पडू दिला. त्यामुळे मयत व्यक्तीच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला असून नगरपालिकेच्या दोषी कर्मचाऱ्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close