आपला जिल्हा

अजब प्रेमाची गजब कहानी! एकमेकींच्या प्रेमात पडलेल्या 3 मुली घरातून फरार

कानपूर – कानपूरमध्ये तीन मुलींच्या विचित्र प्रेमाची आश्चर्यकारक कहाणी समोर आली आहे. एकमेकींच्या प्रेमात वेड्या झालेल्या या तिन्ही मुलींनी कुटुंब सोडले आणि एकत्र राहण्यासाठी पळून गेल्या. या तिन्ही मुलींना चकेरी पोलिसांनी गाझियाबाद येथून ताब्यात घेतले आहे. ज्यामध्ये दोन मुली एकमेकींशी लग्न करावे असे सांगून एकत्र राहण्यावर ठाम आहेत. या दोन मुलींना एकमेकींसोबतच राहायचं आहे.
2 सप्टेंबर 2020 रोजी चकेरी पोलिस स्टेशन भागातील 20 वर्षांची मुलगी बेपत्ता झाली होती. तिच्या कुटुंबीयांनी याबद्दलची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून मुलींचा शोध सुरू केला असता तिचे लोकेशन गाझियाबादमध्ये सापडले.
पोलिसांनी तिथून एकत्र राहणार्या तीन मुलींना ताब्यात घेतले, त्यांना चकेरी पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलं. यापैकी दोन मुली कानपूरच्या असून एक लखनऊची आहे.

यापैकी एक मुलगी कुटुंबातील सदस्यांनी समजून सांगितल्या नंतर देखील घर सोडून निघून गेली. दोन्ही मुली एकत्र राहण्यावर ठाम आहेत. पोलिस स्टेशनमध्ये मुलींवरून हाय व्होल्टेज ड्रामा चालूच होता.

अयोध्येत झाले दोन मुलींचे लग्न

यूपीमधल्या मुलींमधील प्रेमसंबंधाची ही पहिली घटना नाही. ऑगस्टमध्ये अयोध्येतही अशीच एक घटना समोर आली होती, जिथे दोन युवतींनी आपापसात लग्न केले. कानपूरची राहणारी मुलगी अयोध्येच्या साहिबगंज परिसरातील मावशीच्या घरी येत असे. याच काळात तिचे साहबगंज येथे राहणाऱ्या दुसर्या मुलीवर प्रेम जडले. दोन वर्षांपासून चाललेल्या या प्रेमाची बातमी अचानक दोघींच्या लग्नानंतर आली.

या दोघींनीही अयोध्या कोतवाली शहरातील पोलिसांना सांगितले की त्या दोघीही प्रौढ आहेत, त्यांचे कानपूरच्या तपस्वी मंदिरात 26 ऑगस्ट रोजी लग्न झाले होते. दोघी अयोध्या कोतवाली शहरात पोहचल्या तेव्हा एकीने वधूचे वस्त्र तर दुसरीने वरासारखा साज केला होता. पायाच्या बोटात लग्नाचे जोडवी होती. त्यानंतर कपाळावर कुंकू आणि हातावर मेहंदी होती.

पोलिसांनी सांगितले की या दोन महिलांची कुटुंबेही या लग्नाच्या विरोधात नाहीत, म्हणून लग्न झाल्यावर या दोघीही एकत्र राहण्यास मोकळ्या आहेत आणि कुटुंबातील सदस्यांनी हे मान्य केले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close