आपला जिल्हा

जिल्हयातील खरीप पिक कर्जासाठी पात्र शेतकऱ्यांनी ३० सप्टेंबरपर्यंत बँकांकडे अर्ज करावेत

 बीड — जिल्हयातील खरीप पिक कर्जासाठी अर्ज दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ज्यांनी एकदाही कर्ज घेतलेले नाही, अशा जुन्या व ज्यांनी कर्ज घेतलेले आहे. व जे पुन्हा कर्ज घेण्यास पात्र आहेत, अशा सर्व शेतकऱ्यांनी संबंधीत बँकेकडे खरीप पिक कर्ज मागणीसाठी ३० सप्टेंबर २०२० पर्यंत अर्ज करावेत.जे शेतकरी ३० सप्टेंबर २०२० पर्यंत अर्ज करतील अशा सर्व शेतक-यांचे अर्ज बँकांनी स्विकारावेत. जे बँक व्यवस्थापक अर्ज स्विकारणार नाहीत किंवा स्विकारण्यास टाळाटाळ करतील अशा बॅक व्यवस्थापका विरुध्द कडक कार्यवाही करण्यात येईल. तसेच ज्या शेतकऱ्यांनी व शेतक-यांची माहिती तलाठी व सोसायटी यांच्या मार्फत बँकेला दिलेली आहे. पात्र शेतकऱ्यांचे अर्ज संबंधीत बँकेकडे प्रलंबीत आहेत. अशा बँक व्यवस्थापकांनी पिक कर्जास पात्र शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपाची कार्यवाही जलद गतीने करावी. यात हयगय करणा-या बँक व्यवस्थापकांवर नियमानुसार कार्यवाही अनुसरन्यात येईल, यांची गंर्भीर नोंद सर्व बँक व्यवस्थापकांनी घ्यावी. असे जिल्हा प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close