आपला जिल्हा

घर गळायला लागल्यावर बाहेर कशाला मूतायचं ? प्रशासनाची अवस्था ढोलकी सारखी

बीड — एकीकडे कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना आरोग्य विभागावर अतिरिक्त ताण पडत आहे. कर्मचाऱ्यांची कमतरता व अन्य सुविधां अभावी रुग्णांचे हाल होत आहेत. काही प्रमाणात का होईना रुग्ण संख्या तात्पुरती आटोक्यात आणण्यासाठी जनता कर्फ्यूचा पर्याय प्रशासन निवडण्याच्या तयारीत आहे. मात्र काही सुजान व्यापाऱ्यांकडून याला विरोध होत आहे. चेंडू प्रशासनाच्या कोर्टात आहे. शहरी भागातील नागरिक हे सुजान सुशिक्षित समजला जातो. अशी मंडळी दोन्हीकडून चुना लावून प्रशासनाच्या नावाने बोंब ठोकायला सध्या रिकामी झाली आहे. रुग्ण संख्या वाढली , रुग्णांचे हाल झाले तिकडून व लॉकडाऊन केलं तर गरिबांचे हाल होतात लोकांनी खायचं काय असा प्रश्न उपस्थित करून इकडूनही प्रशासनाच्या नावाने कोकलायच एकूणच प्रशासनाची अवस्था ढोलकी सारखी झाली आहे. त्यामुळे परिस्थीती हाताबाहेर गेल्यानंतर आता मोदी सरकार असो की ठाकरे सरकार असो प्रत्येकानेच अप्रत्यक्ष हतबलता दाखवत जगरहाटी पुन्हा नव्याने सुरु केली आहे मग जिल्हाधिकारी साहेब तुम्हीच काळजी करताय? घर गळायला लागल्यावर मुतायला बाहेर जायच कशाला फक्त जे होईल ते पहात रहा.
सुरुवातीच्या काळामध्ये जिल्ह्यात कोरोना रुग्ण आढळला नाही त्यावेळी प्रशासनाची वाहवाई मोठ्या प्रमाणावर झाली जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांच्यावर स्तुतीसुमने उधळली गेली आणि ते योग्य होते. मात्र जसजशी लॉक डाऊन मध्ये सूट मिळत गेली तसतशी रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली. या काळामध्ये लोकप्रतिनिधी विजनवासात गेल्याचे पहावयास मिळाले आजही हीच परिस्थिती आहे. आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची कमतरता हा पहिल्यापासून ऐरणीवर आलेला प्रश्न आजही जैसे थे च आहे तो अद्याप सुटलाच नाही. लोकप्रतिनिधी या महत्त्वाच्या प्रश्नाकडे पाठ फिरवून आहेत. मात्र कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येवरून व आरोग्य विभागातील अव्यवस्थेमुळे प्रशासन टीकेच्या रडारवर आहे. एकीकडे शहरातील अशिक्षित मोलमजुरी करणारा वर्ग रोजीरोटी कशी मिळेल यातच मग्न आहे तर दुसरीकडे स्वतःला सुजान ,सुशिक्षित, आधुनिक मानणारा शहरातील वर्ग बिनधास्तपणे बोंबलत हिंडताना सरकारी नियम पायदळी तुडवताना दिसत आहेत. त्यामुळे संक्रमणाचा धोका प्रचंड वाढला आहे. आता त्यावर उपाय म्हणून पुन्हा जनता कर्फ्यू लावण्याचा घाट प्रशासनाने घातला आहे. काही कालावधीसाठी का होईना वाढती रुग्ण संख्या आटोक्यात आणणे शक्य असले तरी पोट भरलेली ढेरपोटी व्यापारी मंडळी देखील गरिबांचं नाव पुढे करून जनतेने खायचं काय असा प्रश्न उपस्थित करत जनता कर्फ्यू ला विरोध करत आहेत. मोकाट फिरणाऱ्या ना सध्या लाॅक डाऊन नको आहे. मग जनता कर्फ्यूचा घाट कशासाठी घातला जात आहे ? मोदी सरकार असो की ठाकरे सरकार असो त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेचा गाडा चालवण्यासाठी होईल ते होऊ द्या असं म्हणत व कोरोना सोबत जगायचे शिकावे लागेल असा संदेश देत जगरहाटी पुन्हा सुरू केली आहे. नियमांच पालन करा असं सांगितलं जात असल तरी सरकारच्या दृष्टीने मरणारांचे आकडे वाढतील. त्याचा सरकारला काय फरक पडणार याच दोन्ही सरकारच्या नीतीचा वापर करत प्रशासनाने देखील नियमांचं पालन करणार नाही ते कोरोना संकटात सापडतील. जगतील ते ठीक अन्यथा त्यांचा परिवार त्याचे परिणाम भोगील प्रशासनाला तरी काय फरक पडणार आहे? जनता कर्फ्यू लावला तरी प्रशासनावर टीका होणार आहे तसेच रुग्णांचे हाल होत आहेत व मृतांचे आकडे वाढले तरी टीका होणार आहे. मग जे व्हायचे असेल ते होऊ द्या. सध्या कोरोना महामारी ने घरच गळू लागले आहे तर विचार कशाला करायचा जेवढी व्यवस्था प्रशासनाकडे आहे तेवढ्या व्यवस्थेचा सक्षमतेने वापर करावा एवढीच अपेक्षा जनतेकडून व्यक्त केली जात आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close