आपला जिल्हा

गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा; सांडस चिंचोली परिसरातील गावांचा तुटला संपर्क

बीड — जायकवाडी धरणाचे पाणी सोडल्यामुळे तसेच गुरुवारी रात्री झालेल्या पावसाने बीड जिल्ह्यातील गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला . बीड जिल्ह्यामधील माजलगाव तालुक्यातील सांडस चिंचोली गावच्या परिसरातील काही छोट्या गावांचा संपर्क तुटला आहे.

दरवर्षी मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती असते. यंदा मात्र चांगला पाऊस होत आहे. माजलगाव तालुक्यातील सांडस चिंचोली हे गाव गोदाकाठी वसलेले आहे. यातच जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडल्यामुळे गोदावरी नदीला पाणी आले आहे. गोदाकाठच्या इतर गावांना देखील जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला असून सांडस चिंचोली परिसरातील गावांचा संपर्क काही वेळेसाठी तुटला होता. शुक्रवारी दुपारनंतर मात्र पाणी कमी झाल्याचे चित्र पहायला मिळाले. सध्या येथील गावांना कुठलाही धोका नसल्याचेही प्रशासनाने सांगितले आहे.
बिंदुसरा ओव्हरफ्लो

जिल्ह्यातील अकरा तालुक्यात समाधानकारक पाऊस पडला असून बीड तालुक्यातील बिंदुसरा धरण ओव्हरफ्लो झाले आहे. याचा परिणाम बीड शहरातून गेलेल्या बिंदुसरा नदी पात्रा लगतच्या वस्तीला सतर्कतेचा इशारा नगरपालिका प्रशासनाने दिला आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close