आपला जिल्हा

बीड जिल्हा कोरोना रुग्णसंख्या फक्त 178

बीड — जिल्ह्यात आज शुक्रवारी आणखी 178 नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची भर पडली आहे. गुरुवारी तपासणीसाठी पाठवलेले 1497 अहवाल शुक्रवारी दुपारी आरोग्य विभागाला प्राप्त झाले. यामध्ये 178 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत तर 1319 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा वाढता आकडा आरोग्य विभागाकडे नवे आव्हान निर्माण करत आहे. अंबाजोगाई मध्ये 35 रुपये सापडले असून आपेगाव घाटनांदुर केशवनगर याठिकाणी रुग्णसंख्या जास्त असून अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्याचे एक कर्मचारी पॉझिटिव्ह निघाला आहे. आष्टी मध्ये सुर्डी टाकळसिंग येथे तुलनेने अधिक रुग्ण सापडले त्यामुळे इथला आकडा सहावर जाऊन पोचला आहे. बीड तालुक्यामध्ये 31 वर रुग्ण संख्या गेली असून देवी बाभळगाव, पालसिंगण चौसाळा देगलूर बीडची शिक्षक कॉलनी शाहूनगर याठिकाणी रुग्ण संख्या अधिक आढळून आली. धारूर मध्ये सापडलेल्या तेरा रुग्णांमध्ये कसबा विभाग हिंगणी बुजुर्ग जाधव गल्ली येथील रुग्णांचा भरणा जास्त आहे. गेवराई 15 रुग्ण सापडले असले तरी या रुग्णांमध्ये तरुणांचा अधिक समावेश आहे. केज मध्ये एकोणीस रुग्ण सापडले यामध्ये लहुरी बोरगाव सोनिजवळा शिक्षक कॉलनी केज या ठिकाणी रुग्ण संख्या जास्त सापडली. माजलगाव मध्ये अकरा रुग्णही मंगलनाथ कॉलनी केसापुरी कॅम्प या ठिकाणचे जास्त आहेत. परळी 27 संख्या असून विद्यानगर जिरेवाडी मांडेखेल, समता नगर प्रिया नगर याठिकाणी अधिक रुग्ण सापडले. पाटोदा मध्ये दहा रुग्ण सापडले . शिरूर आठ तर वडवणी मध्ये तीन रुग्ण सापडले आहेत. या तीन तालुक्यांमध्ये आज रुग्णसंख्या कालच्या तुलनेने कमी आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close