क्राईम

अंत्यसंस्काराला जाणार्‍या चौघांना गावगुंडांकडून बेदम मारहाण होळ येथील घटना

केज — अंत्यसंस्काराला जात असताना गाडी रस्त्यात बंद पडली असताना होळ येथील काही गावगुंडांनी चौघा जणांना बेदमपणे मारहाण केल्याची घटना बुधवारी रात्री घडली. मारहाण झालेल्या दोघांची प्रकृती गंभीर असल्याने जखमींना अंबाजोगाईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी डीवायएसपींसह युसुफवडगाव पोलिसांनी भेट दिली. या प्रकरणातील आरोपींना मात्र अद्यापही अटक करण्यात आलेली नाही. एलसीबीची टीम रात्रीपासून घटनास्थळी तळ ठोकून आहे.

निजामोद्दीन खमरोद्दीन काझी (वय ५०) सोहेल बाबू तांबोळी (वय ४०), असलम शाकेर अत्तार (वय ३२), लायक बाबामियॉ मुल्ला (वय ३८) सर्व रा. धारूर) हे रात्री एका गाडीने धारूरहून अंबाजोगाईला अंत्य-संस्कारासाठी निघाले होते. होळच्या पुलाजवळ त्यांची गाडी बंद पडल्याने होळ येथील काही गावगुंडांनी कुठलाही मागचा पुढचा विचार न करता या चौघांना बेदम मारहाण केली. यातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. घटनेची माहिती डीवायएसपी व यूसुफवडगाव पोलिसांना झाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. या प्रकरणी आज दुपारपर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता. दोषींविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी जमियत उलमा-ए-हिंदच्या वतीने करण्यात आली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close