आपला जिल्हा

साखर कारखान्यावर जाणाऱ्या मजुरांचा ट्रक आडवला;आ. सुरेश धस यांना अटक

आष्टी — सध्या ऊसतोड कामगारांचा संप सुरू असताना साखर कारखान्यावर जात असलेल्या ऊसतोड कामगारांना आमदार सुरेश धस यांच्या समर्थकांनी आष्टी येथे अडवल्यामुळे सुरेश धस यांच्यावर पोलिसांनी आज दुपारी गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.

महाराष्ट्रात ऊसतोड मजूरांचा संप सुरु असताना मालेगाव, नाशिक येथून काही ऊसतोड मजूरांना घेऊन जाणारे तीन ट्रक मिरजगाव (जि.अहमदनगर) च्या हद्दीत म्हाडा तालुका, कर्जत तालुक्यातील अंबालिका या कारखान्यांवर हे मजूर चालले होते. सुरेश धस समर्थकांनी त्यांना थांबवून आष्टी येथे घेऊन आल्यानंतर या वाहनांमधून जवळपास ४०० ते ४५० मजूर आपल्या लहान मुलांसहीत कुठलीही कोरोना शी निगडीत काळजी न घेता जात असल्याचे चित्र पाहायला मिळाले. या मजूरांची कसल्याही प्रकारची कोरोनाची टेस्ट करण्यात आलेली नाही.

सध्या कुठलाच कारखाना सुरु नसतानाही ही मजूर वाहतूकीची घाई कशासाठी असे सांगत सरकार जोपर्यंत ऊसतोड मजूर आणि मुकादम यांच्या वाढीव मोबदल्याबाबत निर्णय घेत नाहीत तोपर्यंत ऊसतोड मजूर आम्ही जाऊ देणार नाहीत. तसेच सध्या आमचा संप शांततेत सुरु असून अशा पद्धतीने कारखानदार वाहतूक करणार असतील तर आम्हाला आमचा संप अधिक आक्रमक करावा लागेल असा इशारा आ. सुरेश धस यांनी दिला. दरम्यान आमदार सुरेश धस यांनी या ऊसतोड मजुरांच्या खाण्यापिण्याची सोय केली होती. पोलिसांनी त्यांना अटक केल्यानंतर काही वेळातच त्यांना जामिनावर सोडण्यात आले.″

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close