आपला जिल्हा

सात तालुक्यातील एंटीजन टेस्टमध्ये पुन्हा 82 रुग्ण सापडले

बीड — आज दुपारी आलेल्या अहवालामध्ये 342 रुग्ण सापडले होते.त्यानंतर रात्री आलेल्या अॅन्टीजन टेस्टमध्ये पुन्हा 82 रुग्ण नव्याने सापडले आहेत. बुधवारची त्यामुळे रुग्णसंख्या रुग्णसंख्या 424 वर जाऊन पोहोचली आहे.
जिल्ह्यातील मोठ्या गावांमध्ये अंटिजन टेस्ट मोठ्या प्रमाणात केल्या गेल्यामुळे रुग्णसंख्या झपाट्याने वाढल्याचे निदर्शनास आले. 16 सप्टेंबर रोजी सात तालुक्यातील मोठ्या गावांमध्ये झालेल्या एंटीजन टेस्टमध्ये पुन्हा 82 रुग्ण सापडले. आज दिवसभरात 2145 जणांची तपासणी करण्यात आली. चौसाळा येथे पुन्हा दोन रुग्ण पॉझिटिव्ह सापडले. माजलगाव मध्ये 50 टेस्टमध्ये एकही रुग्ण आढळून आला नाही. परळी तालुक्यात मोहा व पोहनेर येथे अनुक्रमे 162 व 145 जणांची टेस्ट घेण्यात आली यामध्ये चार रुग्ण मोहा येथे तर एक रुग्ण पोहनेर येथे सापडला. धारुर शहरात सर्वाधिक म्हणजे 1064 जणांची तपासणी करण्यात आली यामध्ये 46 रुग्ण आढळून आले. वडवणी मध्ये 176 जणांच्या तपासणी मध्ये तेरा रुग्ण सापडले. केज तालुक्यातील नांदुर घाट मध्ये 298 जणांच्या तपासणीत चार रुग्ण सापडले. पाटोदा तालुक्यातील नायगाव येथे 58 जणांची तपासणी केली मात्र सर्व रिपोर्ट निगेटिव्ह आले आहे. डोंगर किनी येथे 55 जणांचा तपासणी आठ रुग्ण कुसळंब येथे 65 जणांच्या तपासणीत तीन रुग्ण तर अमळनेर येथे 67 जणांच्या तपासणीत एक रुग्ण सापडला आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close