आपला जिल्हा

बुधवारी कोरोना रुग्णांचा आकडा 342 वर

बीड — जिल्ह्यात बुधवारी दुपारी मिळालेल्या अहवालांमध्ये देखील कोरोना रुग्णांची संख्या धक्कादायक आहे. 15 सप्टेंबर रोजी एंटीजन टेस्टमध्ये 176 एक रुग्ण सापडले तर स्वॅब तपासणीमध्ये देखील 166 रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे हा आकडा 342 वर जाऊन पोहोचला आहे.
कोरोना संक्रमणाने ग्रामीण भागामध्ये हातपाय पसरल्याचे दिसत असल्यामुळे चिंतेची बाब निर्माण झाली आहे. आज बुधवारी मिळालेल्या आवाजामध्ये शिरूर कासार सारख्या ग्रामीण भागात मोडणाऱ्या तालुक्यामध्ये रुग्ण संख्येने 56 चा आकडा गाठला आहे. त्याखालोखाल बीड तालुक्यामध्ये 41 रुग्ण आढळून आले आहेत ‌ गेवराई मध्ये 39, वडवणी मध्ये 35 रुग्ण सापडले आहेत. अंबाजोगाई मध्ये 34 तर धारूर मध्ये तेहतीस रुग्ण सापडले आहेत‌. याबरोबरच आष्टी मध्ये सतरा, केज मध्ये 24 माजलगाव मध्ये 13 परळी मध्ये 27 पाटोदा मध्ये 23 रुग्णसंख्या आढळून आली. या अहवालामध्ये देखील सर्वात जास्त रुग्ण संख्या ही तरुण वर्गाची आढळून आली आहे. ‌

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close