आपला जिल्हा

बीड जिल्ह्यात अॅंटीजन टेस्ट सह रुग्णांचा आकडा 404 वर

बीड. — कोरोना संक्रमणाने बीड जिल्ह्याला चांगलेच विळख्यात घेतले असल्याचे सध्या पहावयास मिळत आहे. ग्रामीण भागामध्ये पसरत चाललेला कोरोना येणाऱ्या काळामध्ये आरोग्य विभागा पुढे मोठे आव्हान निर्माण करणार आहे. 40 मोठ्या गावांमध्ये अंटिजन टेस्टच्या दुसऱ्या दिवशी 228 रुग्ण सापडले. तर स्वॅब तपासणी मधून 176 रुग्ण सापडले त्यामुळे जिल्ह्याची एकूण रुग्ण संख्या 404 वर जाऊन पोहोचली आहे.
बीड धारूर गेवराई, परळी शिरूर व पाटोद्याने रुग्णसंख्येचा उच्चांक प्रस्थापित केला आहे. अंबाजोगाई मध्ये सतरा रुग्ण सापडले आहेत तर आष्टी मध्ये 29 रुग्ण सापडले आहेत. बीड ने विक्रमी रुग्णसंख्या पार पाडत तब्बल 74 आकडा गाठला आहे. धारूर तालुक्यांमध्ये देखील 43 रुग्ण नव्याने आढळले आहेत. गेवराई मध्ये 34 रुग्ण सापडले असून मालेगाव चकलांबा सिरसदेवी या ठिकाणी मोठ्या संख्येने रुग्ण सापडले. केज मध्ये देखील आडस सारणी सांगवी याठिकाणी रुग्णसंख्या आधीक आढळून आली. केज ची संख्या 27 वर पोहोचली. माजलगाव तालुक्यामध्ये देखील रुग्ण संख्येने 15 चा आकडा गाठला. बीड पाठोपाठ परळीने अर्धशतका चा आकडा पार करत संख्या 62 वर जाऊन पोहोचली. पाटोदा सारख्या ग्रामीण भागामध्ये देखील कोरोना ने चांगलेच हातपाय पसरले असून 34 वर रुग्णसंख्या गेली. अशीच स्थिती शिरूर तालुक्याची देखील आहे. जवळपास अर्धशतकाचा आकडा या तालुक्याने देखील गाठला 49 रुग्ण येथे सापडले. वडवणी मध्ये 20 रुग्ण सापडले यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाच्या दोन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close