आपला जिल्हा

गोदाकाठच्या बाधीत गावांना पुराचा धोका ? प्रशासन अलर्ट

    • कोरोना आणि पूर परिस्थितीचा एकोप्याने मुकाबला करू — आमदार लक्ष्मण पवार यांनी घेतला आढावा

गेवराई — आधीच, कोरोना सारख्या महामारीला रोखण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करत असताना, गोदाकाठच्या बाधीत गावांना पूर परिस्थितीला सामोरे जावे लागण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, मंगळवार ता. 15 रोजी आमदार पवार यांनी वेगवेगळ्या विभागाचा आढावा घेऊन, प्रशासनाला अलर्ट राहायला सांगून, विविध विषयांवर सूचना दिल्या आहेत.

आ. पवार यांनी दिवसभरात तहसील, आरोग्य विभागाच्या बैठका घेऊन, पुरवठा विभागाच्या तक्रारीचा निपटारा करण्याच्या सूचना ही दिल्या. .
दरम्यान, गेवराई तालुक्यात चांगला पाऊस झाला असून, गोदाकाठच्या परिसरात ओलावा आहे. तसेच, पैठणच्या धरणातून गोदावरी नदीच्या पात्रात सहा हजार क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले आहे. बॅरेजेस भरले आहेत. त्यामुळे, गोदाकाठच्या बाधीत गावांना पुराचा धोका निर्माण होऊ शकतो, हे गृहीत धरून आपत्कालीन यंत्रणा सज्ज असायला हवी, अचानक संकट उभे राहिले तर पळापळ नको, अशी सूचना ही आमदार लक्ष्मण पवार यांनी यावेळी बोलताना केली आहे. बैठकीला तहसीलदार प्रशांत जाधवर, मुख्याधिकारी उमेश ढाकणे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संजय, वैद्यकीय अधिकारी डाॅ राजेश शिंदे, दादासाहेब गिरी, प्रा. येळापुरे,
संजय आंधळे, तलाठी, ग्रामसेवक, मंडळाधिकारी यांच्यासह आरोग्य, महसूल, पुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. आमदार पवार यांनी सांगितले की,
पैठण येथील जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून, धरणाचे 18 दरवाजे उघडले असून गोदापात्रात सहा हजार क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे, पाण्याचा जोर वाढला तर अचानक पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यासाठी गोदाकाठच्या नागरिकांनी व संबंधित मंडळाधिकारी, तलाठी,ग्रामसेवक यांनी सतर्क राहावे असे आवाहन करून, गोदाकाठच्या गावांना राशन वाटप करण्याची सूचना आ. पवार यांनी केली आहे. उपजिल्हा रुग्णालयात आढावा बैठक घेऊन, आमदार पवार यांनी कस्तुरबा गांधी विद्यालयातील कोरोना सेंटरची पहाणी केली. तालुक्यातील गोदाकाठच्या गावात पूर परिस्थिती निर्माण होण्याची भीती असून याबाबत उपाययोजना करण्यासाठी आ.पवार यांनी मंगळवारी तहसिल कार्यालय, उपजिल्हा रुग्णालयात आढावा बैठक घेऊन अधिकारी, कर्मचारी, तलाठी, मंडळाधिकारी, नागरिक यांच्याशी चर्चा करून सद्यस्थितीची माहीती घेतली. बैठकीत गोदाकाठच्या अनेक गावचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. नागरिकांनी प्रशासनाच्या आदेशाचे पालन करून सतर्क राहावे असे आवाहन ही त्यांनी यावेळी बोलताना केले. तालुका स्तरावर प्रशासनाच्या वतीने माहीती घेतली जात असून, गोदाकाठच्या बाधीत गावातील पोलीस पाटील, सामाजिक कार्यकर्ते, तलाठी, मंडळाधिकारी यांच्यासह विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क ठेवला जात असून, संभाव्य धोका ओळखून उपाययोजना करण्यात येतील, अशी माहिती तहसीलदार प्रशांत जाधवर यांनी आढावा बैठकीत बोलताना दिली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close