महाराष्ट्र

छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशातील मोदींचे छायाचित्र केले व्हायरल, राजस्थानच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल

अंबाजोगाई — महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशातील पंतप्रधान नरेंद्र मोदींचे छायाचित्र फेसबुकवर पोस्ट केल्याप्रकरणी राजस्थानातील व्यक्तीवर अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील बोधीघाट येथील तरुणाने याप्रकरणी तक्रार दिली आहे.
अमोल उर्फ मुक्तेश्वर भानुदास वाघमारे रा. बोधीघाट, अंबाजोगाई यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, 13 सप्टेंबर रोजी रात्री 9 च्या सुमारास ताराचंद शेखावत रा. भिलवाडा, राजस्थान या व्यक्तीने त्याच्या फेसबुक अकाऊंटवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोशाख केलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र पोस्ट केले. त्यामुळे आमच्या सामाजिक भावना दुखावल्या आहेत. या छायाचित्रात आमचे आदर्श कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक लोकराजा छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र सार्वजनिकरित्या कलुषित केले आहे. अशी तुलना करणे योग्य नाही. सामाजिक तणाव निर्माण करून सामाजिक स्वास्थ बिघडविण्याचा उद्देशाने ताराचंद शेखावत याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि छत्रपती शिवाजी महाराजांची अनाठायी तुलना करणारे छायाचित्र सोशल मिडीयावर पोस्ट करून व्हायरल केले आहे असा तक्रारीत उल्लेख आहे. सदर तक्रारीवरून ताराचंद शेखावत याच्यावर अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाआहे .

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close