आपला जिल्हा

कोरोना लस सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी अजून 4 ते 5 वर्षं लागतील – अदर पूनावाला

मूंबई — कोरोना लसीचे उत्पादन सध्या पुरेसं असून सर्वान पर्यंत लस पोहोचण्यासाठी आणखी चार ते पाच वर्षाचा कालावधी लागू शकतो तसेच 2024 पर्यंत कोरोना लसीचा तुटवडा जाणवेल असं सिरम इन्स्टिट्यूट चे सीईओ अदर पूनावाला यांनी फायनान्शियल टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

औषध कंपन्या जलद गतीने उत्पादनक्षमता वाढवत नसल्यामुळे हा वेळ लागणार आहे.”गोवर लसीकरण मोहिमेप्रमाणे कोरोना लस दोन टप्प्यात द्यायची म्हटलं तरी जगाला सुरुवातीला जवळपास 15 अब्ज कोटी डोस लागतील,” असंही त्यांनी म्हटलंय.

देशातील लस पुरवठ्याची जी साखळी आहे, तिची स्थिती पाहिल्यास देशातल्या 140 कोटी लोकांपर्यंत लस सुरक्षितपणे सगळ्यांपर्यंत कशी पोहोचवता येईल, याचाही विचार करावा लागणार असल्याचं पुनावाला यांनी म्हटलं.

सिरम इन्स्टिट्य़ूट जगातील 5 इतर कंपन्यांसोबत मिळून कोरोनाचे 1 अब्ज डोस तयार करणार आहे.
यापैकी अर्धे डोस भारतासाठी राखीव ठेवण्यात येईल, तर अर्धे डोस जगाला पुरवण्यात येतील, असं सिरम इन्स्टिट्य़ूटनं स्पष्ट केलं आहे.पण, अमेरिका आणि युरोपातून मोठ्या प्रमाणावर लशीची मागणी करण्यात आली, तर इतर देश मागे पडतील, असंही पूनावाला म्हटल्याचं बातमीत नमूद करण्यात आलं आहे.
दरम्यान, सिरम इन्स्टिट्यूटच्या लशीची किंमत 225 रुपये असणार आहे.
सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या पुण्यातल्या संस्थेने 10 कोटी कोरोनावरील लशीच्या डोसेसची निर्मिती करण्यासाठी गावी (Gavi), बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन यांच्यासोबत करार केला आहे.
गेट्स फाऊंडेशनच्या स्ट्रॅटेजिक फंडमार्फत 15 कोटी अमेरिकन डॉलर्स या लशीच्या निर्मितीच्या कामात वापरले जाणार आहेत.या लशीच्या प्रत्येक डोसची किंमत 3 अमेरिकन डॉलर म्हणजे 225 रुपये असणार आहे. 92 देशांमध्ये ही लस उपलब्ध करून देणार असल्याचंही सिरम इन्स्टिट्यूटने स्पष्ट केलं आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close