आपला जिल्हा

चौसाळा येथील अँटीजेन तपासणी केंद्रास माजी जि. प. सदस्य विलास महाराज शिंदे यांची भेट

    •  उर्वरित व्यापाऱ्यांनी मंगळवारी तपासणी करून घेण्याचे आवाहन

चौसाळा — कोरोनाचा वाढता संसर्ग थांबवण्यासाठी आणि त्याची साखळी तोडण्यासाठी चौसाळा शहरातील व्यापाऱ्यांची अँटीजेन तपासणी करण्यास दिनांक १४ सप्टेंबर सोमवार पासून सुरवात करण्यात आली असून चौसाळा येथील जिल्हा परिषद हायस्कूल केंद्रात ही तपासणी सुरू आहे. या ठिकाणी शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य तथा लोकसभा संघटक बीड धर्मवीर विलास महाराज शिंदे यांनी सकाळी ११:३० वा. च्या दरम्यान भेट देऊन येथील बीड तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्री कासट, चौसाळा प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. कैलास खाकरे यांच्याशी चर्चा केली तसेच चौसाळा येथील सर्व व्यापारी व व्यावसायिकांनी तपासणी करण्यास सहकार्य करण्याचे व उर्वरित व्यापारी, व्यावसायिकांनी दिनांक १५ सप्टेंबर रोजी तपासणी करून घेण्याचे आवाहन केले आहे.

शहरात कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी शहरातील सर्व किराणा व्यापारी, कापड दुकानदार , हेअर सलून दुकानदार, भांडी दुकानदार, फॅब्रिकेशन दुकानदार, मोबाईल दुकानदार, ईलेक्ट्रिक दुकानदार, डॉक्टर, मेडिकल केमिस्ट, हॉटेल दुकानदार, पाणी पुरवठादार, गॅस सिलेंडर पुरवठादार, झेरॉक्स दुकानदार, फर्निचर दुकानदार, चप्पल दुकानदार, जनरल स्टोअर्स, दुधवाले, भाजीपाला विक्रेते, मटण विक्रेते, ऑटोवाले, फेरीवाले, भेळवाले , गाडेवाले , चहावाले , सफाई कर्मचारी आदींसह सर्व व्यावसायिक, व्यापारी यांची चौसाळा येथील जिल्हा परिषद हायस्कूल येथील केंद्रात तपासणी सुरू असून (ता. १५) सप्टेंबर पर्यंत ही तपासणी करण्यात येणार आहे. 

या वेळी शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य तथा बीड लोकसभा संघटक विलास महाराज शिंदे यांच्या समवेत ग्रामपंचायत सदस्य अतुल (भैय्या) शिंदे, माजी सरपंच राजेश आप्पा नाईकवाडे आदी उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close