देश विदेश

आश्चर्यकारक !लॉकडाऊन काळात किती स्थलांतरित मजुरांचा मृत्यू झाला याची माहिती केंद्राकडे नाही.

नवी दिल्ली — कोरोना संकटामुळे अचानक लॉक डाऊन करावे लागले याचा सर्वाधिक फटका स्थलांतरित कामगार आणि मजूर वर्गाला बसला होता. रोजगार ठप्प झाल्यामुळे कामगारांनी आपल्या मूळ गावी जाण्याचा मार्ग स्वीकारला. यावेळी अनेक मजुरांचा रस्त्यात मृत्यूदेखील झाला मात्र केंद्र सरकारकडे याची कुठलीही माहिती उपलब्ध नसल्याचे उत्तर केंद्र सरकारने दिलं आहे याबाबत आज लोकसभेत विरोधी पक्षाकडून विचारणा करण्यात आली होती.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. दरम्यान,देशाच्या फाळणीनंतर पहिल्यांदाच लाॅक डाऊन मुळे मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले होते. यावेळी अनेकांचा उपासमारीने व अपघाताने मृत्यू झाला होता.लोकसभेत आज विरोधी पक्षाने केंद्र सरकारला प्रश्न विचारले यामध्ये देशात लॉकडाउनदरम्यान किती स्थलांतरीत कामगारांचे मृत्यू झाले? असाही प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर उत्तर देताना केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाने सांगितले की, “विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेल्या ६८ दिवसांच्या लॉकडाउनमध्ये किती लोकांचा मृत्यू झाला, याची सरकारजवळ कोणतीही माहिती नसल्याचं वृत्त द इंडियन एक्स्प्रेसनं दिलं आहे.
त्याचबरोबर सरकारने पीडित व्यक्तींच्या कुटुंबियांना काही अनुदान किंवा आर्थिक मदत केली आहे का? या प्रश्नावर देखील श्रम मंत्रालयाने “याबाबतचा डेटा सरकारजवळ उपलब्ध नसल्यामुळे पीडितांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्याचा प्रश्नच येत नाही.” असं उत्तर दिल्याचे म्हटले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close