क्राईम

रुग्णालयात तपासलेल्या तीन पैकी दोन महिलांचे गर्भ सुदाम मुंडेने गायब केले

चौकशीत खळबळजनक सत्य उघडकीस

बीड — स्त्री भ्रूण हत्येप्रकरणी शिक्षा भोगत असलेला व सध्या जमिनीवर असलेला क्रूरकर्मा डॉक्टर सुदाम मुंडे याने बेकायदेशीर रित्या हॉस्पिटल सुरू करून दोन महिलांचे गर्भ गायब केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या निर्देशावरून पोलीस व आरोग्य विभागाने केलेल्या कारवाईत बेकायदेशीर हॉस्पिटल सुरू करणारा सुदाम मुंडे जेरबंद करण्यात आला आहे.ठोस पुरावे उपलब्ध होण्यास मदत व्हावी यासाठी न्यायालयाने पुन्हा त्याच्या पोलीस कोठडीत वाढ केली आहे.दरम्यान आरोग्य विभाग व पोलीस प्रशासन सखोल चौकशी करून भक्कम पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न करत आहे. या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांची चौकशी केली जात आहे. या चौकशी मधून परळी माहेर असलेल्या व पुणे हैदराबाद येथे राहणाऱ्या तीन महिलांची चौकशी केली असता यामधील दोन महिलांचे गर्भ गायब झाल्याचे धक्कादायक सत्य उघडकीस आले.आरोग्य विभाग व पोलीस प्रशासनाने या महिलांचे जबाब घेतले असून आणखी हाती काही सापडते का याचा शोध घेतला जात आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close