क्राईम

परळीत आरटीई अंतर्गत गोरगरिबांच्या मोफत प्रवेशात गैर प्रकार

  ■  पालकांकडून खोटी माहिती ऑलाइन अर्जात भरून मोफत प्रवेश बळकावण्याचा डाव

मोफत प्रवेश मिळावा या साठी पालकां कडून चुकीची माहिती भरल्याचे उघड.

  गैर प्रकार करणाऱ्यावर गुन्हे दाखल करा – मनोज जाधव

   परळी गटशिक्षणाधिकारी यांची शिक्षण विभागा कडे तक्रार

      शिक्षण विभागा मार्फत चौकशीचे आदेश

बीड — सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाच्या आरटीई अंतर्गत इंग्रजी शाळेतील २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रिया कोरोना च्या प्रादुर्भावामुळे उशिराने सुरू आहे. या वर्षाकरिता आरटीई अंतर्गत २५ टक्के प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले होते

याकरिता पालकांनी आपल्या पाल्यांचे प्रवेश अर्ज वेबसाईडवर ऑनलाईन पदधतीने भरण्यात आले होते. याची दि.१७ मार्च २०२० रोजी शासनाच्या वतीने राज्यस्तरीय लॉटरी काढण्यात आली. या लॉटरीद्वारे बीड जिल्ह्यातील परळी वै.तालुक्यातील 412 विद्यार्थ्यांची निवड मोफत प्रवेशासाठी झाली. कोरोना च्या प्रादुर्भावामुळे यंदाच्या वर्षी प्राथमिक कागदपत्रांची पडताळणी ही शाळा स्तरांवरच करण्यात आली आहे. प्राथमिक तपासणी झाल्यानंतर शाळांनी हे कागदपत्रे तालुकास्तरीय पडताळणी समितीकडे पडताळणीसाठी पाठवणे आवश्यक आहे.यात दि. २५ ते ३१ ऑगस्ट पर्यंत सबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी आरटीई अंतर्गत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांचे संपूर्ण कागदपत्रे तालुकास्तरीय पडताळणी समिती कडे पडताळणी साठी पाठवण्यात आली असता काही पालकांनी ऑनलाईन पोर्टलवर चुकीची व खोटी माहिती भरून मोफत प्रवेश बळकवीले आहेत.हे आता निदर्शनास आलेले आहे.मात्र या घटने मुळे या योजनेतून लाभ मिळणारे खरे गोरगरीब ,गरजवंत या योजने पासून वंचित राहिली आहेत. ही बाब परळी गटशिक्षणाधिकारी यांच्या लक्षात येताच त्यांनी गैरमार्गाने झालेल्या प्रवेशावर आक्षेप घेत या संबंधी शिक्षण विभागाकडे रीतसर पत्रा द्वारे तक्रार केली आहे. या तक्रारीवर तात्काळ कारवाई करत शिक्षण विभागाने चौकशी समिती नेमण्यात आली आहे.या चौकशी समितीत माजलगाव चे गटशिक्षण अधिकारी बेडसकर शिक्षण विस्तार अधिकारी महामुनी व काळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.या समितीला शिक्षण विभागाने परळी तालुक्यातील काहि पालकांनी गैरमार्गाचा वापर करुन प्रवेश मिळविण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे आरटीई कायदयाचा भंग होत आहे. तसेच ज्या शाळेच्या बाबतीत हे झालेले आहे त्या शाळा व्यवस्थापनानेही या प्रवेश प्रक्रिय बाबत अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. तर तालुकास्तरीय पडताळणी समितीनेही दुर्लक्ष केल्याचे प्रथम दर्शनी दिसून येते . वरिल प्रमाणे प्रवेश प्रक्रियेस जे जबाबदार आहेत त्यांची तात्काळ चौकशी करुन गैरमार्गाचा वापर करुन ज्या पालकांनी प्रवेश मिळविण्याचा प्रयत्न केलेले आहे त्यांच्या प्रवेश बाबत आपला स्पष्ट अभिप्राय नोंदविण्यात यावा आणि प्रवेश प्रक्रियेचा अंतिम दिनांक १५ सप्टेंबर आहे. त्यामुळे तत्पुर्वी आपला अहवाल सादर करावा. त्यावर निर्णय घेणे आवश्यक आहे. त्यामुळे दिनांक १४ सप्टेंबर पुर्वी आपला अहवाल स्पष्ट अभिप्रायासह सादर करावा.विलंब होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

गैर प्रकार करणाऱ्यावर गुन्हे दाखल करा – मनोज जाधव
परळी तालुक्यात मोठ्या प्रमाणात आरटीई अंतर्गत मोफत प्रवेशात गैर प्रकार घडला आहे.या मुळे खरे गरजवंत गोरगरीब या योजने पासून वंचित राहत आहेत. आरटीई हा कायदा आहे. त्यामुळे या कायद्याची पामल्ली करणाऱ्या पालक ,शाळा ,कर्मचारी व हे बोगस प्रवेश करून देणाऱ्या संबंधितावर गुन्हे दाखल करावेत.जेणे करून या कायद्याचे उल्लघण होणार नाही.आणि या पुढे गोरगरिबांच्या प्रवेशा वर कोणी डल्ला मारणार नाही.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close