देश विदेश

तामिळनाडूच्या खासदाराची 89 कोटीची मालमत्ता ईडीकडून जप्त

नवी दिल्ली – विदेशी चलन व्यवस्थापन कायद्याचा भंग केल्या प्रकरणी ईडी म्हणजेच सक्त वसुली संचालनालयाने तामिळनाडू मधील लोकसभेचे खासदार एस. जगतरक्षकन आणि त्यांच्या कुटुंबियांवर छापा टाकून त्यांची 89 कोटी 19 लाख रूपयांची मालमत्ता जप्त केली आहे.

त्यांनी सिंगापुर मधील एका कंपनीशी व्यवहार करून जितक्‍या रकमेचा बेकायदेशीर व्यवहार केला तितक्‍या रकमेची मालमत्ता आम्ही जप्त केली आहे असे ईडीने म्हटले आहे. जगतप्रकाश यांनी फेमा कायद्याचा भंग करून विदेशात गुंतवणूक केल्याचे उघडकीला आले आहे असे ईडीचे म्हणणे आहे.
त्यांनी सिंगापुरच्या मेसर्स सिल्व्हर पार्क इंटरनॅशनल कंपनीचे सुमारे 90 हजार शेअर्स खरेदी केले आहेत. त्यातील 70 हजार शेअर्स खासदार जगतरक्षकन यांचे आहेत तर त्यांच्या मुलाच्या नावावर 20 हजार शेअर्स आहेत. या प्रत्येक शेअर्सची किंमत 1 सिंगापुरी डॉलर्स इतकी आहे.
त्यासाठी त्यांनी रिझर्व्ह बॅंकेची अनुमती घेणे अपेक्षित होते पण त्यांनी ती घेतली नाही असे ईडीचे म्हणणे आहे. या प्रकरणाची पुढील चौकशी सुरू आहे

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close