आपला जिल्हा

निरोप समारंभा वरून घरी परतणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू

खजाना विहिरीजवळील नदीत कार कोसळली

बीड — प्रशासकीय बदली झाल्यामुळे नेकनूर येथील निरोप समारंभाचा कार्यक्रम आटोपून बीडला घरी येत असताना कार वरील ताबा सुटल्यामुळे कार नदीत जाऊन कोसळली यात गंभीररित्या जखमी झालेल्या पोलीस कर्मचारी महेश अधटराव यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला ही घटना खजाना विहिरीजवळ रात्री बाराच्या सुमारास घडली

नेकनूर पोलीस ठाण्यात गेल्या सहा वर्षापासून कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी महेश अधटराव यांची गेवराई येथे नुकतीच प्रशासकीय बदली झाली. त्यामुळे नेकनुर येथे निरोप समारंभाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. हा कार्यक्रम पार पडल्यानंतर ते स्विफ्ट कार क्रमांक एम एच 23 ए एस 6004 मधून बीडला घराकडे येत होते. गाडी खजाना विहिरीजवळ आल्यानंतर त्यांचा कारवरील ताबा सुटला. गाडी डिव्हायडर ला धडकून नदीत जाऊन कोसळली. या दुर्घटनेत अधटराव गंभीर रित्या जखमी झाले‌. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात त्वरित हलवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.घटनास्थळी बीड ग्रामीणचे सहायक पोलिस निरीक्षक सुजित बडे, पोह.जयसिंग वाघ आदींनी धाव घेतली होती. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close