महाराष्ट्र

मातोश्री उडवून देण्याची व शरद पवारांना धमकी देणारा आरोपी जेरबंद

मुंबई– अभिनेत्री कंगना राणावतने मुंबईची तुलना पाक व्याप्त काश्मिर सोबत केल्यानंतर तिच्यावर टीका करणारे शिवसेना नेते संजय राऊत यांना धमकी देणा – या माथेफिरूला कोलकात्यातून अटक करण्यात आली होती . याच आरोपीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी , राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार , गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही आलेल्या धमक्या त्यानेच दिल्याचे चौकशीत कबुल केले आहे .पलाश बोस असे आरोपीचे नाव असून कोलकत्यातील टॉलीगंज भागातून त्याला राज्याच्या दहशतवाद विरोधीत पथकाने ( एटीएस ) त्याला अटक केली होती . शिवसेना नेते संजय राऊत यांना तर एका माथेफिरूने सोशल मिडियावर खुल्ली जिवे मारण्याची धमकी दिली होती .
महाराष्ट्रात सत्तास्थापनेपासून ते सुशांत सिंह राजपूत प्रकरणात वेळोवेळी शिवसेना नेते संजय राऊत भाजपला अंगावर घेत होते . सुशांत सिंह राजपूत प्रकरणात कंगनाने उडी घेतल्यानंतर राऊतांनी तिला चांगलेच फटकारले . दोघांमध्ये चांगलाच शाब्दीक वाद झाला . कंगनाने मुंबई मला पाक व्याप्त काश्मिरसारखी वाटत असल्याचे विधान केल्यानंतर अनेकांनी तिच्यावर टीका केली . या वादा दरम्यान कंगनाच्या एका चाहत्याने समाज माध्यमाद्वारे शिवसेना नेते संजय राऊत यांना धमकी दिली . या घटनेची गंभीर दखल घेऊन महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने संबधित व्यक्तीचा माग काढला . त्यावेळी तो कोलकत्ता येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली . त्यानुसार पोलिसांच्या एका पथकाने त्याला अटक केली आहे . त्याला कोलकत्तामधील न्यायालयात हजर करून ट्रान्झिस
रिमांडद्वारे मुंबईत आणले जाणार असल्याचे सांगितले जात आहे . आरोपी व्यायाम शाळेत प्रशिक्षक म्हणून दुबईत काम करतो . याच आरोपीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी , राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी , गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवासस्थानीही यांनाही त्यानेच धमकीचे दूरध्वनी केल्याचे चौकशीत कबुल केले आहे.त्यासाठी त्याने दुबईतील मोबाईल क्रमांकाचा वापर केला . त्याच्याकडून दोन मोबाईल संच , भारतातील एक सीमकार्ड व दुबईतील तीन सीमकार्ड जप्त करण्यात आली आहे .

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close